Jalgaon

Breaking: शेतकऱ्यांनो सावधान..! येत्या 48 तासात कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस..! गारपिटीची शक्यता..! ह्या जिल्ह्यांना येलो अलर्ट..

Breaking: शेतकऱ्यांनो सावधान..! येत्या 48 तासात कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस..! गारपिटीची शक्यता..! ह्या जिल्ह्यांना येलो अलर्ट..!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता राहणार आहे. काही भागात गारपीट देखील होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे. पंजाब डखं यांनी नुकताच हा तातडीचा मेसेज शेतकऱ्यांसाठी जारी केला आहे. डखं यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पासून म्हणजेच 26 एप्रिल 2023 पासून ते 28 एप्रिल 2023 पर्यंत राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे.

तसेच काही भागात गारपीट होणार आहे. या कालावधीमध्ये वीज पडण्याची देखील शक्यता राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहावे लागणार आहे, असं परभणीचे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सांगितले आहे.

कोणत्या जिल्ह्यात राहणार पावसाची शक्यता?

पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील भोकरदन, जालना, सिल्लोड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, लोणार या भागात पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.

पुढील ४ दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज
हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच २८ एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

दुसरीकडे, उत्तर पश्चिम आणि पश्चिम मध्य भारताच्या तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते, परंतु उष्णतेची लाट येणार नाही, असा अंदाज आहे.
३० ते ४० किमी ताशी वेगाने वारे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या ठिकाणी
जोरदार वारे वाहतील. नाशिक वगळता ३० ते ४० किमी ताशी वेगाने वारे वाहतील
तसेच जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि
रत्नागिरी या जिल्ह्यांत यलो अलर्ट जाही करण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार वारे वाहतील. त्याचवेळी पाऊसही पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच सिंधुदुर्गात तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली येथेही वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. साताऱ्यात काही ठिकाणी तुरळ पावसाचा अंदाज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button