Faijpur

प्रखर इच्छाशक्तीने शाहिरी गुण आत्मसात करता येतात – शाहीर शिवाजी पाटील

प्रखर इच्छाशक्तीने शाहिरी गुण आत्मसात करता येतात – शाहीर शिवाजी पाटील

सलीम पिंजारी

आधुनिक युगात ऐतिहासिक संदर्भांना वीररसप्रधान शाहिरीच्या माध्यमातून ज्वलंत समस्यांचे जागृती करता येते. स्वतःला कलावंताची परंपरा नसतानाही निरीक्षण व स्वयम् प्रयत्नांनी शायरी क्षेत्रात नावारूपाला आलो तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या अंगभूत गुणांचा वापर करून समाज जागृतीसाठी सहभाग द्यावा असे आवाहन शाहीर शिवाजी पाटील यांनी केले. कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय पोवाडा गायन कौशल्य कार्यशाळा विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून पार पडत आहे. आजच्या सत्रात शाहीर शिवाजी पाटील, शाहीर बाबुराव मोरे,शाहीर जितेंद्र भांडारकर, शाहीर गोकुळ म्हसकर, शाहीर योगेंद्र राउळ, शाहीर मिलिंद शेडगे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शायरीच्या विविध अंगाचे सादरीकरणातून केले.

यावेळी ‘हाय पैसा दुनिया मे कमाल हो गया’ अशा आधुनिक काळातील पैशाच्या मागे धावणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचे पोवाड्याच्या माध्यमातून समाचार घेण्यात आला. यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांच्या अंगावर शहारे आणणार्‍या पोवाड्यांचे गायन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ जी जी कोल्हे, डॉ कल्पना पाटील, डॉ एस व्ही जाधव, डॉ आर एन केसूर प्रा, एच जी नेमाडे, डॉ ताराचंद सावसाकडे, प्रा एस डी पाटील यांनी परिश्रम घेतले. पोवाडा गायन कौशल्य कार्यशाळेला तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर अध्यक्ष माननीय श्री शिरीषदादा चौधरी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button