Kolhapur

शिक्षक भारतीची शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग याच्याबरोबर सहविचार संभा संपन्न.

शिक्षक भारतीची शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग याच्याबरोबर सहविचार संभा संपन्न.

सुभाष भोसले-कोल्हापूर
शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग यांच्याबरोबर विविध प्रलंबित विषयावर शिक्षक भारतीची सहविचार सभा संपन्न झाली..यावेळी शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचारी मान्यता झालेबरोबर त्याबाबत पगारासंदर्भार्तील कार्यवाही त्वरीत व्हावी,सर्वाचे वेतन 1 तारखेला हावे.कर्मचाऱ्यांची प्रॉव्हीडंट फंडासंदर्भातील सर्व कामे त्वरीत व्हावीत. वरीष्ठ,निवड श्रेणी संदर्भात निर्णय व्हावा.डी. सी. पी .एस धारकांना हिशेबाच्या पावत्या देणेत यावेत .एकाच संस्थेतील बदल्यांना त्वरीत मान्यता मिळणेबाबत कार्यवाही व्हावी.सर्व कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकाची दुबार प्रत दरवर्षी पूर्ण करून मिळणेबाबत शाळांना आदेशीत करणेत यावे.यावेळी खाजगी.माध्यमिक,उच्यमाध्यमिक शाळातील शिक्षकानी पाठ टाचण वही काढणेबाबत स्पष्टीकरण दयावे .या मिटींगला शिक्षण उपसंचालक श्री सोनवणे व इतर सर्व जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी इत्यादी उपस्थित होते.त्यांच्या सोबत
शिक्षकभारतीचे राज्य उपाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, राज्याचे प्रमुख कार्यवाह व जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर,पुणे विभाग उपाध्यक्ष अर्जुन सावंत,सुधाकर माने जिल्हाध्यक्ष सांगली, काकासाहेब भोकरे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर,जिल्हासंघटक दादासाहेब लाड,उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब डेळेकर,जिल्हासचिव अनिल चव्हाण, जे एस पाटील सांगली, संघटक फैसल पटेल, रत्नागिरी जिल्हा कार्यवाह व माध्यमिक पतपेढीचे चेअरमन निलेश कुंभार, सुरेश चौकेकर कार्यवाह सिंधुदुर्ग ,सांगली ,रत्नागिरी व कोल्हापूर विभागांतील पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button