Maharashtra

शेतीस मुबलक वीज द्या – राज्यमंत्री शरद पाटील-यड्रावकर

शेतीस मुबलक वीज द्या – राज्यमंत्री शरद पाटील-यड्रावकर –

कोल्हापूर प्रतिनिधी तुकाराम पाटील –

गतवर्षी मुबलक पाऊस पाणी झाल्यामुळे नदी, विहीर , तलाव, लघु बंधारे यांना भरपूर पाणी आहे. मात्र शिवारातील पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यां ना शेतीस जास्त वीज महावितरण कंपनीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री शरद पाटील यड्रावकर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
सध्या करण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. या काळात सर्व उद्योग धंदे , कार्यालय, व्यवसाय बंद आहेत, यासाठी लागणारे विजेची मागणी कमी आहे. मात्र शेती असा एक व्यवसाय आहे.तो कधीही बंद ठेवता येत नाही. शेतकरी दिवस-रात्र काबाडकष्ट करून आपल्या शिवारातील पिक जगण्यासाठी धडपडत असतो. उन्हाचा वाढता प्रभाव पाहता शिवारातील पिके पाण्याविना वाळून जाण्याची भीती आहे. मुळातच शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे, त्यातच आणखीन भर नको म्हणून जी शिवारात पिके आहेत त्यांना तरी पुरेसे पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांना मुबलक वीज द्यावी अशी मागणी राज्य मंत्री शरद पाटील – यड्रावकर यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button