रावेर

शरद महाजन, भाजपा प्रवेश कोणाला ठरणार मारक किंवा कोणाला होणार तारणहार. …

शरद महाजन, भाजपा प्रवेश कोणाला ठरणार  मारक किंवा कोणाला होणार तारणहार. …

शरद महाजन, भाजपा प्रवेश कोणाला ठरणार मारक किंवा कोणाला होणार तारणहार. ...

रावेर प्रतिनिधी विलास ताठे
रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कोमात, तर भाजपा जोमात. ..
रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक माथ्यावर येवून ठेपली असता, अचानक माजी गृहमंत्री राजमंत्री कै जे. टि. महाजन यांचे सुपुत्र विद्यमान मधुकर साखर  सहकारी कारखान्याचे चेअरमन श्री शरद महाजन,
माजी जिल्हा परिषदेचे सदस्य तर  डझनभर सहकारी संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी तथा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शरद महाजन, यांनी केवळ काॅग्रेस पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांनी त्यांच्या कामाकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर महाराष्ट्र राज्यात काॅग्रेस कडून प्रभावी तरुण कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, त्यांचे विचार, कार्याला साथ श्रेष्ठी कडून लाभत नसून, माझ्या सारख्या प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्त्याने तरीही गेली पंधरा वर्षे काॅग्रेस ची धूरा यावल तालुक्यात सांभाळली पण पदरी निराशा, कधीही स्थानिक  लोक प्रतिनिधींनी माझ्या सारख्या तरूण, उच्च शिक्षित वारसा लाभलेल्या नेतृत्वाला, धडपडणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याला मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेच्या मनातील भावी आमदाराला न्याय काॅग्रेस पक्षाकडून मिळाला नाही, तसेच माझे अस्तित्व सिमीत ठेवण्यासाठी सदा स्थानिक पातळीवर कारस्थान चालले. म्हणून माझी प्रतिभा, कसब हे सर्व सामान्य जनतेला मी दाखवू शकलो नाही, 
याउलट कै, जे. टि. महाजन यांनी  रक्ताचे पाणी करून रावेर यावल तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या भल्यासाठी आणि 
 तरूणांना रोजगार निर्मिती साठी मधुकर सहकारी साखर कारखाना उभा केल्या. यावेळी कारखान्याची स्थिती बिकट झाली तरी स्थानिकांनी कोणतीही मला वा कारखान्याच्या भवितव्यासाठी प्रयत्न वा मदत केली नाही, 
या सर्व बाबींचा अभ्यास केला असता शरद महाजन, हे केवळ स्थानिक काॅग्रेस नेतृत्वाच्या गटबाजी, त्याचे प्रभावी नेतृत्व छबी कुठेतरी कोणी तरी मुद्दाम झाकून ठेवत आहे, किंवा तिला प्रकाश झोतात येवू देत नाही, अशा अनेक शंका कुशंका , अनुत्तरीत प्रश्नांची मालिका यांतून  ऐन रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या तोंडावर सर्वाना आश्चर्य वाटले आणि. एक प्रकारे रावेर, यावल तालुक्यातील 
 काँग्रेसला त्यांनी दिलेला जबर हादसा असून  विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे यांना सुखद धक्का आहे.
यावरून रावेर काॅग्रेस चे उमेदवार शिरीष चौधरी यांना एक प्रकारे हा फार्म भरण्या पूर्वी अपशकुन राजकिय विश्लेषकांनी वर्तविला आहे, कारण 
 शरद महाजन, हे न्हावी मोठ्या गावाचे संरपच, 
 स्वत काॅग्रेस चे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य तर त्यांच्या पत्नी ही माजी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचे स्वतःचे मोठे वलय असूनही कै जे. टि महाजन, यांच्या विचारांचा मोठा वर्ग रावेर यावल तालुक्यात आजही आहे, त्यामुळे शरद महाजन, किमान पंधरा ते वीस हजार मते सह भाजप कडे वळवू शकतात, 
त्यांच्या बरोबर मसाका चे काही काॅग्रेस चे विद्यमान संचालक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व  प्रमुख नेते व कार्यकर्ते सह मोठ्या प्रमाणावर काॅग्रेस संघटनेतील तरूण कार्यकर्तेही भाजपात धुळे येथे जे. पी. नडडा,भाजपचे नेते 
 यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश करणार आहे, असे खुद्द शरद महाजन यांनी न्हावी येथील फुटसेल बाजार समितीच्या बैठकीत माहीती दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button