जागतिक आदिवासी दिनानिमित्त 10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गुणगौरव
प्रतिनिधी- आनंद काळे
बारामती – जागतिक आदिवासी दिनानिमित्त,बारामती तालुक्यातील आदिवासी जमातीतील 10 वी व 12वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरवले असल्याचे माहिती महाराष्ट्र पारधी विकास संस्थेचे, उपाध्यक्ष श्री आनंद काळे(सर) यांनी प्रसारमाध्यमाना दिली.
संपूर्ण देश्यामध्ये कोरोनाचा हाहाकार पाहवयास मिळत आहे,प्रादुर्भाव वाढला आहे.आदी कोरोनाग्रस्थ रुग्णाची संख्या शहरामध्ये जास्त होती, आत्ता ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे या वर्षी जागतिक आदिवासी दिनानिमित्त होणारा उसत्व रद्द करून होणाऱ्या खर्चातून आदिवासी समाज्यातील लोकांना मदत करण्याचे आवाहन आदिवासी उसत्व कमिटीचे समन्वयक श्री बापू काळे ह्यांनी केली.
तसेच बारामती तालुक्यातील 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ येत्या 9 ऑगस्टला सकाळी 11वा करण्याचे योजले आहे अशी माहिती आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेचे प्रदेशसचिव श्री उपदेश भोसले ह्यांनी प्रसारमाध्यमांना दिली






