Mumbai

?मोठी बातमी..लॉक डावूनच्या तयारीला लागा… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश…लवकरच राज्यात मोठया निर्णयाची शक्यता…

?मोठी बातमी..लॉक डावूनच्या तयारीला लागा… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश…लवकरच राज्यात मोठया निर्णयाची शक्यता…

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

शासनाने लागू केलेले कडक निर्बंध नागरिक पाळत नसल्याने मुख्यमंत्र्याने ही भूमिका घेतली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महारष्ट्रातील प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसध्याची परिस्थिती पाहता राज्याला १५ दिवस लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगितले आहे.

राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा करण्यात आलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button