Maharashtra

चोपडा तालुक्यातील वडगाव बु|| खून प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

चोपडा तालुक्यातील वडगाव बु|| खून प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा 

चोपडा तालुक्यातील वडगाव बु|| खून प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
 चोपडा तालुक्यातील  वडगांव बु।। येथील आरोपी मंगल धनसिंग गायकवाड याने फिर्यादी दशरथ हसरत भिल हा दि.17/8/2018 रोजी दुपारी 1 वाजता त्याच्या घरात जेवण करत असताना आरोपी याने फिर्यादीची पत्नी खाटेवर बसलेली असताना तिचा हात धरला हे फिर्यादीच्या लक्षात आल्यावर फिर्यादी त्याच्या पत्नीचा हात सोडविण्यास गेला असता आरोपीने त्याचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादीने कशीबशी आरोपिपासून सुटका करत तेथून पळ काढला.त्यानंतर आरोपीने त्याच्या घरातून कुर्हाड घेऊन आज तुला जिवंत सोडत नाही असं म्हणून त्याचा पाठलाग केला.फिर्यादी त्यावेळेस मरीआई च्या मंदिरामागे लपला असता मंदिरावर बसलेला रामदास हसरथ भिल याने तु कुणाच्या मागे पळतो आहेस असे विचारणा केली असता त्याचा राग येऊन आरोपीने त्याच्यावरही कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे सासरे गणेश सुका भिल हा मध्ये आला असता आता तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत गणेश भिल याला झोपडीत ढकलले व मानेवर,डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केल्याने गणेश सुका भिल हा जागीच ठार झाला.त्यानंतर आरोपी कुऱ्हाडीसह मंदिरावर बसून आरोळ्या मारत होता त्यावेळी गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.त्याच्याविरुद्ध 302,307 व 354 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असल्याने सदर खटल्याचे कामकाज अमळनेर मा.न्यायालयात चालल्यानंतर आरोपीस मा.न्यायालयाने दोषी धरून आरोपीस भा.द.वी.कलम302 मध्ये जन्मठेपेची शिक्षा व दंड रु.3000,दंड न भरल्यास 1 वर्ष शिक्षा, भा.द.वी.कलम 307 मध्ये 5 वर्षे शिक्षा व 2000 रु.दंड,व दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा तर कलम 354 प्रमाणे दीड वर्ष शिक्षा व 1000 रु.दंड,दंड न भरल्यास 6 महिने अशी शिक्षा अमळनेर न्यायालयाचे न्यायाधीश राजीव पांडे यांनी सुनावली.खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री. किशोर आर.बागुल मंगरुळकर यांनी पाहिले तर सदर गुन्ह्यात तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी तपास केला व पैरवी अधिकारी भामरे तर केस वाच म्हणून पो.ना.महेश रामराव पाटील यांनी काम पाहिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button