Pandharpur

प्रा.सुभाष माने यांच्याकडून आरोग्य सेवकांना शाबासकी सन्मान करून वाढवला उत्साह

प्रा.सुभाष माने यांच्याकडून आरोग्य सेवकांना शाबासकी सन्मान करून वाढवला उत्साह

प्रतिनिधी
रफिक आतार

सोलापूर जिल्हा परिषदेच्या तुंगत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता हे प्रत्येकाच्या घरी जाऊन तपासणी केली त्यांना औषधोपचार दिला या आशा वर्कर्स यांचा जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समिती सदस्य रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष प्राध्यापक सुभाष माने यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र शाल, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.हा कार्यक्रम शुक्रवार 24 डिसेंबर रोजी झाला. यावेळी सुभाष माने यांनी या आरोग्य सेवकांना शाबासकीची थाप देत यापुढेही चांगल्या पद्धतीने काम करून जिल्हा परिषदेचे नाव लौकिक वाढवा असे आवाहन केले.
त्यावेळी पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले, तुंगत ग्रामपंचायतीचे उपसरपंच लामकाने, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य संजय सरवदे, ग्रामसेवक श्रीधर चेंडगे, डॉक्टर दत्ता माने, सुपरवायझर बाजारे , महेश गोडसे, अरुण महाजन, आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत नवत्रे, डॉक्टर रणजित रेपाळ, आरोग्य सहाय्यक फिरोज शेख, आरोग्य सहाय्यका जया लंगोटे, सरस्वती चौगुले, अरुणा पाटेकर, अश्विनी तारे, किरण इंगळे, डॉक्टर राजकुमार रणदिवे, डॉक्टर सुरेखा कोंडभैरी, डॉक्टर अनुजा निंबाळकर, अमित रोकडे, क्लार्क क्षिरसागर, आरोग्य सेवक पी एल गायकवाड, आशा प्रवर्तक वर्षा पाटोळे, सुनिता चव्हाण, पुष्पा हाडमोडी, वैशाली कुंभार, सुवर्णा कुंभार, तानाजी रणदिवे वाहन चालक सिद्धेश्वर रणदिवे, अमित मुळे, संदीप राऊत व इतर मान्यवर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तुंगत येथील सर्व कर्मचारी व आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button