Faijpur

फैजपूर येथील कुसुमताई चौधरी विद्यालयात शिक्षक दिन साजरा व शिक्षक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

फैजपूर येथील कुसुमताई चौधरी विद्यालयात शिक्षक दिन साजरा व शिक्षक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

सलीम पिंजारी

फैजपुर– येथील कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालयात ५ सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी के चौधरी हे होते.

सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांना घडवावे असे आवाहन केले. संस्थेचे उपाध्यक्ष पंडितराव कोल्हे,ए ए उबाळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बालवाडी, प्राथमिक,माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. उमेश चौधरी,सदस्य अशोक पाटील, शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक एस जे तळेलेसर,पर्यवेक्षक बी. एम. बोंडे सर,प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योत्स्ना चौधरी, बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली खाचणे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ पल्लवी भारुडे मॅडम यांनी केले,तर आभार वाय आर लोधीसर यांनी मानले.सर्व संस्था चालकांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button