Amalner

अमळनेर: कोंढावळ येथे पिक नियोजनाची  जलरागिनींची गावसभा संपन्न…

कोंढावळ येथे पिक नियोजनाची जलरागिनींची गावसभा संपन्न…

अमळनेर तालुक्यातील कोंढाव येथे पिक नियोजनाची गामसभा घेण्यात आली. कोंढावळ येथे गावातील ग्रामस्थाच्या ऊपस्थितिट जलमित्र व समृद्धगाव योद्धा मिना पाटील,मितूताई पाटील,वैशाली पाटील यांच्या प्रयत्नातून गावसभा घेण्यात आली.
ह्या ग्रामसभेला लोकांना बोलावण्यासाठी समृद्धगावयौद्ध्या महिलांनी फोन आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून येण्याचे आव्हान केले, गावात दवंडी दिली. गावातील जालमित्र डाॅ भूषन पाटील यांनी *वॉटर कप* स्पर्धे दरम्यान गावात कुठली जलसंधारणाची कामे झाली याची थोडक्यात माहिती दिली. नंतर पाटोदा आणि हिवरे बाजार ची फिल्म दाखवून जलव्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट करून त्यावर चर्चा केली. त्यामध्ये आता आपण सुद्धा हिवरे बाजार प्रमाणे जलव्यवस्थापन करण्यासाठी माहिती संकलित करत आहोत. जेणेकरून आपल्याला जलव्यवस्थापन करता येईल. त्यानंतर PPT च्या माध्यमातून संकलित डेटा वैशाली पाटील यांनी गावकऱ्यांसमोर मांडला. त्यावर चर्चा देखील झाली. त्यामध्ये यावर्षी आतापर्यंत गावामध्ये पडलेला पाऊस, विहिरींची पातळी, मागील रब्बी, बारमाही, द्वीहंगामी पिकांसाठी 44.26 कोटी लिटर चा उपसा झाला. आणि या वर्षी रब्बी, बारमाही, द्वीहंगामी पिकांसाठी 38.97 कोटी लिटर चा उपसा करण्याचे नियोजन आहे.

चर्चेला आलेले मुद्दे

1) ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे.
2) पाण्याचा काटेकोर वापर.
3) आपण या वर्षी वाढवला आहे.
4) आपल्या कडे असलेल्या जलबाचतीच्या पूर्ण साधनांचा वापर आपण स्वतः करावा.
5) मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी उपसा कमी आहे.
6) कारण आपल्या गावात या वर्षी ठिबक सिंचनाचा वापर जास्त आहे.
7) जे शेतकरी पटपणी देतात त्या ऐवजी आपण ठिबक वापरावं.

झालेले निर्णय

1) ठिबक खालील क्षेत्रात वाढ करणे.
2) आपल्या कडील जलबचतीच्या साधनांचा पूर्ण वापर.
3) जल व मृदा संधारणाचे ऊपचार करणे व पाणी साठा वाढवने
4)कमी पिण्यिवरती येणारी पिक घेणे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button