भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी बी के कावळे विद्यालयात साजरा
सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी बी के कावळे विद्यालयात साजरा करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून आज जागतिक आदिवासी दिन निमित्ताने क्रांतिकारक भांगरे व बिरसा मुंडा यांना अभिवादन विद्याल याच्या वतीने करण्यात येत आहे देशाच्या राष्ट्रपती पदावर भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्ताने आदिवासी महिला द्रौपदी मुरमु यांना मिळालेला मान हा आदिवासी बांधवां यांच्यासह पूर्ण देशा ला अभिमानाचा भाग असे गौरव उद्गार बीके कावळे विद्यालयाचे प्राचार्य बीके शेवाळे यांनी जागतिक आदिवासी दिन व सामुदायिक राष्ट्रगान या कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते . कादवा सहकारी साखर कारखाना राजाराम नगर कार्यस्थळावरील कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित बीके कावळे विद्यालय राजाराम नगर जागतिक आदिवासी दिन व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांना सुरुवात करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.यावेळी पंचायत समिती दिंडोरी शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय जनगणमन या राष्ट्रगीताचे समूह गान आयोजित करण्यात आले होते यावेळी मुख्याध्यापक बीके शेवाळे पर्यवेक्षिका श्रीमती व्ही आर जाधव कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख बाळासाहेब वडजे त्यांच्यासह उपस्थित शिक्षकांच्या हस्ते क्रांतिकारक राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले प्रास्ताविकात कनिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रमोद पगारे यांनी आदिवासी दिन व उपक्रम यांची माहिती दिली यावेळी प्राध्यापक बाळासाहेब वडजे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने भारत देशाच्या प्रगतीचा व क्रांतिकारकांचा आढावा घेतला या यावेळी सूत्रसंचालन माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती वर्षा दिघे यांनी केले यावेळी अध्यक्ष प्रमुख भाषणात प्राचार्य शेवाळे यांनी आदिवासी विविध जातींचे देशाच्या विकासात असलेली योगदान व त्यांनी केलेली प्रगती याचा आढावा घेतला यावेळी त्यांनी स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या उपक्रमाबाबत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची ही माहिती विद्यार्थ्यांना देत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे आभार श्री सुरेश सलादे यांनी मानले यावेळी मोहरम निमित्त शाळेला सुट्टी असतानाही इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते






