Surgana

आदिवासी विकास महामंडळ गोडाऊन  बा-हे येथील केंद्र बंद गोदाम पाला कडून उडवाउडवीची उत्तरे

आदिवासी विकास महामंडळ गोडाऊन बा-हे येथील केंद्र बंद गोदाम पाला कडून उडवाउडवीची उत्तरे

शेतकऱ्यांच्या सोयी साठी आदिवासी विकास महामंडळ ने धान्य खरेदी साठी व शेतकऱ्यांना शेती मालाला योग्य रीत्या भाव मिळावा ह्या दृस्टीकोनातून आदिवासी विकास महामंडळ केंद्र बा-हे येथे चालू केले आहे.
पण गेल्या आठ दहा दिवसा पासून बा-हे केंद्राचे गोदामपाल कूमार भोये हे उडवाउडवीचे उत्तर देऊन आज धान्य खरेदी करू , उदया करू असे ऊडवा उडवी चे उत्तर देत आहे.

आदिवासी विकास महामंडळ गोडाऊन  बा-हे येथील केंद्र बंद गोदाम पाला कडून उडवाउडवीची उत्तरे

गोदामपाल भोये यांनी शेतकरी धान्य नेण्यासाठी विचारायला गेले असता गुरुवारी घेऊन या असे म्हटले होते त्या वेळी शेतकरी गोदामात धान्य घेऊन गेले असता गूरूवार ,शूक्रवार, शनिवार गोदाम बंदच होते व गोदाम सांभाळासाठी एकही शिपाई वा वाचमन राहात नाहीत. तसेच शेतकरी भाड्याच्या वाहनाने ट्रक्टर , पिकप सारख्या वाहनाने २०- २५ किलो मिटरने धान्य घेऊन येतात तर त्या पिकप ट्रॅक्टर तीन दिवस जागेवरच थांबवायला तीन दिवसाचा किती भाडे लागेलं असा प्र१न शेतकऱ्यात पडला आहे. मग हे भात खाजगी व्यापाऱ्यांना दिले ते परवडते असे शेतकऱ्यांचे मत आहे याच्यावर पर्यायी व्यवस्था काय ? असा प्रश्न पडला आहे., यावेळी सामाजिक कार्येकर्त सुरेश वारडे, नामदेव पाडवी हे गोदामपालास जाब विचारणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button