Dindori

वरखेङा मविप्र जनता विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न

वरखेङा मविप्र जनता विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंङोरी ।
शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत वरखेङा येथील मराठा विद्या प्रसारक जनता माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा परमोरी येथील साईकृपा लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
मराठा विद्या प्रसारक समाज माध्यमिक विद्यालयाची सन १९९७/९८ वर्षांतील शाळेचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. शालेय जीवना नंतर नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेर पडलेले सर्व माजी विद्यार्थी एकञ यावे या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मे‌ळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. ‘प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक एन एस पगार होते. या वेळी व्यासपीठावर जे.व्ही.खुर्दळ, घोलप, काशिनाथ थोरमिसे,बी.के.सुर्यवंशी, एस.के.संधान,बी.के.कापडणीस,सी.टी.साळवे,एम.पी.पवार,एस.एस.जाधव,एस पी.कोठूळे आदीसह मान्यवर व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी माजी विद्यार्थी व भारतीय सैन्य दलातील राहूल वेताळ, प्रकाश हारके,सचिन आवारे या जवानासह उच्चपदावर कार्यरत असलेले ॲड.किरण देवकर या माजी विद्यार्थीसह कोरोना योध्दा अंगणवाडी सेविका हिरा गांगूर्ङे या सर्वांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
‘या मेळाव्याच्या अयोजनामुळे एक नवीन दिशा मिळणार असल्याचे माजी विद्यार्थीनी मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी गणेश वडजे यांनी केले.सुञसंचालन हेमंत उफाडे यांनी तर उपस्थितांचे आभार सुनिल उफाडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी इम्तियाज आत्तार संदिप राजगुरू, आप्पा उपाडे संतोष जमधङे,सदाशिव जमधङे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो-दिंङोरी तालूक्यातील वरखेङा येथील मराठा विद्या प्रसारक समाज जनता विद्यालयाला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा प्रसंगी माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक वृंद.(छाया-बाळासाहेब अस्वले वरखेङा)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button