Pandharpur

कोरोना विषाणू व्हायरस महामारीचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांना जनजागृती आव्हान

कोरोना विषाणू व्हायरस महामारीचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांना जनजागृती आव्हान

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन आणि सोलापूर जिल्हा परिषद सदस्य व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वसंत (नाना) देशमुख व पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत (भैय्या) देशमुख यांनी स्व खर्चाने कासेगाव गटातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची भेट घेऊन सर्वाँना मास्क सॅनिटॉय वाटप करण्यात आले, तसेच सर्व ग्रामपंचायतींना आणि वाड्यावस्त्यांवरती जाऊन कोरोना विषाणू व्हायरस महामारी विषयावर जनजागृती करुन सर्व सामान्य नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना घाबरून न जाता कोरोना मुक्तीसाठी अहोरात्र काम करत असलेल्या प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आणि आपल्या परिवाराची व आपली संचारबंदी काळात काळजी घ्यावी व आपण आपल्या गावात कोणालाही येऊं देऊ नये तसेच त्यांना फोन करून तेथे राहून स्व ताची काळजी घ्यावी असे त्यांना सांगा आणि कोणत्याही परिस्थितीत आपण सर्वांनी मिळून मिसळून या महा भयंकर अशा कोरोना विषाणू व्हायरस महामारीचा घरांत राहुन त्याला आपल्या गावातून तालुक्यातुन जिल्ह्यातुन राज्यातुनच नव्हे तर देशातुन हद पार करु यासाठी आपण सर्वांनी जात धर्म पंथ भेदभाव विसरून एकत्र येऊन या कोरोना व्हायरस महामारीच्या विरोधात लढण्यास तयार होऊ या असे आवाहन यावेळी करण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button