पञकारांची मुस्कटदाबी थांबवा राहुल कुलकर्णी यांचेवरील गुन्हे मागे घ्या-पञकार संघाची शासनाकडे मागणी..
परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे दि.१६
मुंबई प्रतिनिधी नितीन जाधव ;-
महाराष्ट्रात सध्या संचारबंदीच्या काळात पञकारांची सातत्याने गळचेपी व मुस्कटदाबी होत असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.वृत्तपञ असो अथवा वेबपोर्टल किंवा टिव्ही चॕनेल आपणास लाॕकडाऊन च्या काळात कोरोना साथरोगाची ईथंभूत माहीती पहायला मिळत आहे .त्यासाठी पञकार बांधवांना स्वतःचा जीव धोक्यात टाकून वृत्तसंकलन करावे लागते व सदरची माहीती काळजीपूर्वक माध्यमाच्या कार्यालयात पाठवावी लागते. सध्याच्या परिस्थितीत पञकारांना अनंत अङचणीचा सामना करावा लागत असताना चुकीची बातमी प्रसारण प्रकरणी बुधवारी दि.15 एप्रिल रोजी अचानक एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना उस्मानाबाद येथुन ताब्यात घेत अटक करण्यात आली होती.
मंगळवारी सकाळी एबीपी माझा वृत्तवाहीनीवरुन बंद रेल्वे सुरु होणार असे रेल्वे विभागाच्या हवाल्याने वृत्त प्रसारित करण्यात आले.त्यानंतर सदरील वृत्ताचा खुलासाही करत रेल्वे सुरू होणार नसल्याचे स्पष्टीकरण प्रसारित केले होते.असे आसताना बांद्रा रेल्वे स्थानकावर जमा झालेली गर्दी एबीपी माझा च्या बातमीमुळे झाल्याचा संबंध लावून कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती .
प्रत्यक्षात बांद्रा रेल्वे स्थानकापर्यत इतक्या मोठ्या संख्येने लोक आले कसे? विविध भागातुन लोकांच्या झुंडी रेल्वे स्थानकात येत होत्या तेव्हा पोलीस प्रशासन काय करत होते .तसेच उत्तर प्रदेश व बिहार ला गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकात आल्याचे सांगत आहेत पण या स्थानकातून बिहार उत्तरप्रदेश ,प.बंगाल ला रेल्वेगाडी जात नाही ..मग ही गर्दी इथेच का जमली त्याच्या मागे कोण मास्टरमाईंड आहे हे शोधणे लांबच राहिले आणि बातमी प्रसारित केली म्हणून पञकाराला अटक केली. सत्य परिस्थिती ची चौकशी करुनच कारवाई व अटक होणे आवश्यक होते पण तसे न करता एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास उस्मानाबाद येथिल राहत्या घरातून राहुल कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले.त्यामुळे पोलीसांनी चौकशी शहानिशा नकरता कोणाच्या निर्देशावरुन गुन्हा दाखल करुन कुलकर्णी यांना अटक केली याचीही चौकशी व्हावी महा राज्य पञकार संघ सदरच्या घटनेचा निषेध करत आहे.यापूर्वी ही कोरोना संचारबंदी काळात अनेक पञकारांना पोलीसांनी मारहाण केली तर काही वर गुन्हे दाखल केले आहेत.संचारबंदीच्या काळात वृत्तपञ माध्यम अङचणीत आली असताना पञकारांना आर्थिक मदत करणे आवश्यक असताना अप्रत्यक्षपणे माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा व गुन्हे दाखल करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे चिञ आहे.केंद्रीय माहीती व प्रसारण मंञी प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले होते संचारबंदी काळात प्रसार माध्यमांच्या प्रतिनीधींना आटकाव करु नये ,पञकारामुळे गावपातळीपर्यंतची परिस्थिती चे आकलन सरकारला होते.तरी ही राज्यभरात पोलीसांनी जवळपास आठ पञकारांना बदडून काढले.तर वस्तूस्थिती निदर्शनास आणून देणाऱ्या पञकारावर बदनामी केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल केले.यामुळे पञकारामध्ये भिती तसेच पोलीसाची दहशत निर्माण झाली आहे.लोकशाही त प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित रहावे यासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी अशा घटनाकडे जातीने लक्ष घालावे व न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पञकारा संघाचे मार्गदर्शक संघटक संजय भोकरे,प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे,कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये ,मुंबई वृत्तवाहीणी अध्यक्ष रणधीर कांबळे,मुंबई अध्यक्ष संदीप माळवदे,कोकण विभाग अध्यक्ष भगवान चंदे,नागपूर विभागीय अध्यक्ष महेश पानसे,उ.महाप्रमुख किशोर रायसाकडा,विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख
प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव,ग्रामीण प्रदेशाध्यक्ष मनिष केत ,मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली होती. महाराष्ट्र राज्य पञकार संघाने अधिकृतपणे आज 12 वाजून 32 मिनीटांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सदरचे निषेध पञ पाठवले तेव्हा सरकारस्तरावर अचानक हालचाली वाढल्या होत्या व त्याचाच एक भाग म्हणून राहुल कुलकर्णी यांना जामीन मिळाला आहे.
तसेच कुलकर्णी यांचा बांद्रा येथे गर्दी जमवण्याचा संबंध नाही त्यांचेवरील गुन्हे शासनाने मागे घ्यावेत अशी पुनश्च मागणी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी जाहीरपणे केली आहे. अशा कठीण काळात महा.राज्य पञकार संघ न्यायाची सत्यमेव भूमिका घेत असल्यामुळे पञकारितेतील वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे.






