Maharashtra

पवारांवर केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेचा गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला चपला जोड्यांचा प्रसाद प्रतिमा दहन करून निषेध राष्ट्रवादीच्या विविध संघटनांच्या सदस्यांनी केले आंदोलन

पवारांवर केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेचा
गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला चपला जोड्यांचा प्रसाद प्रतिमा दहन करून निषेध
राष्ट्रवादीच्या विविध संघटनांच्या सदस्यांनी केले आंदोलन

प्रतिनिधी नूरखान

विश्रामगृहाजवळील महाराणा प्रताप चौकात भाजपचे विधानपरिषदेचे आमदार झालेले गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या बद्दल केलेले बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या विविध संघटना व सेलतर्फे पडळकर यांच्या प्रतिमेला सकाळी 11 वाजता चपला बूटचा प्रसाद देत प्रतिमा दहन केली.
अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध राष्ट्रवादी संघटना व सेल यांच्या वतीने जाहीररित्या उदगार काढत निषेधपर मत व्यक्त करत निषेध व्यक्त केले. व त्या ठिकाणी त्याच प्रतिमेवर वर चप्पल व बुटचा मार देऊन ती प्रतिमा जाळण्यात आले व तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी पडळकरांना आव्हान दिले असून पडळकर यांनी जर अमळनेर तालुक्यात पाय ठेवला तर त्याच्या तोंडाला काळे फासल्यशिवाय पक्ष व कार्यकर्ते राहणार नाहीत.
सदर ठिकाणी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, रणजित पाटील, संभाजी पाटील, बाजार समिती संचालक विजय प्रभाकर पाटील, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनील शिंपी व सनी गायकवाड, भुषण पाटील, निलेश देशमुख, सादिक पठाण, काजल रफिक शेख रफिक, आबीद मिस्तरी, शाहरूख पठान आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button