Maharashtra

अमळनेर येथे भारतीय जनता पार्टी तर्फे वाढिव लाईट बिलांची होळी

अमळनेर येथे भारतीय जनता पार्टी तर्फे वाढिव लाईट बिलांची होळी

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर-राज्यात विज वितरण कंपनी द्वारा वाढिव दराचे लाईट बिल नागरिकाना वितरित करण्यात आले असून ह्या वाढिव लाईट बिलांची होळी आज भारतीय जनता पार्टी तर्फे मा. आ.स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत अमळनेर येथे करण्यात आली.

देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केलेला असल्यामुळे नागरिकांना उतपन्नाचे कुठलेही साधन उपलब्ध नव्हते.लोकांना अन्न पाणी मिळवण्याचे वांदे झालेले आहे जनता 3 महिने लॉक डाउन काळातील वीज बिल भरू शकत आणि त्यात शासनाने वाढीव वीज बिल देऊन जनतेला लुबाडण्याचे काम करत आहे.त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नियोजनाला मोठ्या प्रमाणात धक्का लागला आहे .ह्या सर्व परिस्थितीत विज बिल माफ करण्याची जनभावना राज्यभरात निर्माण झाली आहे.परंतु राज्य शासनाच्या विज वितरन कंपनी तर्फे नागरिकांना वाढिव लाइट बिल वितरित करुन नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटिल,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,माजी जि प सदस्य व्ही आर पाटील,माजी सभापती श्याम अहिरे,सरचिटणीस जिजाबराव पाटिल,राकेश पाटिल,बबलू राजपूत,महेंद्र महाजन,नगरसेविका नूतन पाटील,निवास मोरे,योगिराज चव्हाण,देवा लांडगे,कल्पेश पाटील,राहुल चौधरी,समाधान पाटील,चेतन चौधरी,सौरभ पाटील, मुशाईद शेख,निखिल पाटिल आदि उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button