गायत्री सुपर स्पेशालिटी हॉसपिटल येथे शिवजयंती निमित्त मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन
लातूर : प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्या जयंती निमित्त लातूर येथील प्रसिद्ध सामाजिक वैदयकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे लातूर येथील प्रसिद्ध गायत्री सुपर स्पेशालिटी अँड क्रिटिकल केअर सेंटर चे मुख्य संचालक डॉ. रमेश तुकाराम भराटे यांच्या मार्गद्शनाखाली १९ फेब्रवारी २०२० रोजी मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रका द्वारे कळविण्यात आले आहे
या मोफत रोग निदान शिबिरात रक्तदाब, दमा, मधुमेह, कॅन्सर, श्वसन विकार, छाती विकार या दुर्दर आजारावर तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे या साठी रुग्णांनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे .
तरी गरजू रुग्णांनी गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बार्शी रोड लातूर येथे नोंदणी करावी तसेच ०२३८२-२२४१०१, मो. ९७६७६१८०४४ या दूरध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे मुख्य संचालक डॉ. रमेश भराटे यांनी केले आहे.






