राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराच्या वतीने गंगापूर पोलिसांचे आभार
सुनील घुमरे नाशिक
नाशिक : सोमवारी दिनांक ४ जानेवारी रोजी मध्यरात्री गंगापूर पोलिस ठाणे हद्दीतील भारती जाधव या महिलेला रूग्णालयात दाखल करून माणूसकी चे उत्तम उदाहरण घडवले याबद्दल राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे आणि पदाधिकारींनी गंगापूर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस अधिकारी व कर्मचारींचा सत्कार केला.
गंगापूर पोलिस ठाणे हद्दीतील भारती उत्तम जाधव वय वर्ष २३ या गर्भवती महिलेस ४ जानेवारी मध्यरात्रीच्या वेळी प्रसूती कळा येत होत्या. रात्री च्या वेळी रूग्णालयात दाखल करण्यासाठी सासू व सासरे खाजगी वाहन शोधत होते. वाहन मिळत नसल्याची बातमी गस्तीवर असलेल्या गंगापूर पोलिसांना समजताच क्षणाचाही विलंब न करता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गर्भवती महिलेसह तिच्या नातेवाईकांना शासकीय वाहनाने पोलिसांनी रूग्णालयात पोहोचवले. यानंतर काही मिनिटातच महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. या घटनेत सदर महिला व बाळाचे प्राण वाचले. याकामी पोलिसांचे आभार मानावे तेवढे कमीच.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे, शहर महिला पदाधिकारी लता चौधरी, योगिता आहेर यांनी गंगापूर पोलिस ठाणे येथे जाऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगदल साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन पवार साहेब, पोलिस हवालदार महाले, सोळसे,पवार, उगले यांचा सत्कार केला.






