Mumbai

दलितांना शस्त्र परवाना आणि परदेशी शिष्यवृत्तीच्या क्रिमीलेयरची जाचक अट रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या भेटीला भिम आर्मी.

दलितांना शस्त्र परवाना आणि परदेशी शिष्यवृत्तीच्या क्रिमीलेयरची जाचक अट रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या भेटीला भिम आर्मी.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भिम आर्मीचे नेते अशोकभाऊ कांबळे.यांनी घेतली भेट

लक्ष्मण कांबळे

राज्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये संपूर्ण देशाची आणि महाराष्ट्र राज्याची यंत्रणा कार्यरत असताना , कोरोनाच्या आडून ह्या राज्यातील दलितांवर पर्यायाने आंबेडकरी समुदायावर चोहोबाजूंनी निकराचे हल्ले होत आहेत. शारीरिक हल्ल्यांपासून ते त्यांच्या मूलभूत अधिकारांवर थेट हल्ले होत आहेत. नागपूर मधील अरविंद बन्सोड असो की पुण्यातील विराज जगताप ह्यांचे हत्याकांड असो , हे दोन्हीही हत्याकांड महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकित करणारे आहेत. त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात एक अस्वस्थता पसरली असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे . ह्या आंबेडकरी समाजाला स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना देण्यात यावा , तसेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाने परदेशी शिष्यवृत्तीची जाहिरात काढली होती त्यातील क्रिमीलेअरच्या जाचक आणि अन्यायी अटींवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

ह्या अन्यायाविरोधात भिम आर्मी आणि इतर आंबेडकरी संघटनांनी सोशल मीडियावर प्रचंड सांकेतिक आंदोलन केले,ह्या आंदोलनाची धग इतकी परिणामकारक होती की शासनाला आपला अध्यादेश १९ मे रोजी तात्पुरत्यास्वरूपात मागे घ्यावा लागला.पण त्यानंतर मात्र शासनाची कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून आली नाही.उलटपक्षी आदिवासी विभागाची जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर सुद्धा सामाजिक न्याय विभागाची जाहिरात प्रसिध्द न होणे हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांशी करण्यात आलेला विश्वासघात आहे.सरकारने क्रिमीलेयरची कोणतीही अट घालू नये , तसेच सामाजिक न्याय विभागाचा ८ कोटी ₹ निधी ‘सारथी’ कडे वळविला तो पुन्हा आमचा आम्हाला देऊन आणखी १०० कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याला द्यावेत.

अश्या विविध प्रकारच्या २७ मागण्या भिम आर्मी च्या वतीने केंद्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांनी आज मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे,अशी माहिती भिम आर्मीचे राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

ह्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भिम आर्मीच्या सर्व मागण्यांसबंधी संबंधित मंत्रिस्तरावर सकारात्मक चर्चा करून सुयोग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन भिम आर्मीच्या शिष्टमंडळाला दिले असून ,ह्या शिष्टमंडळात अशोकभाऊ कांबळे* यांच्यासह अविनाश गरुड व रवी नवगिरे यांचा समावेश असल्याची माहिती प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button