कोरोना महामारीच्या काळात ही पाडळसे येथील सर्वंच शासकिय कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत ग्रामस्थांची नाराजी.
प्रतिनिधी सलीम पिंजारी
फैजपूर येथून जवळच असलेल्या पाडळसा तालुका यावल येथील कोरोना व्हायरस ने भारतासह महाराष्ट्रात हाहाकार माजवला असून कोरोना व्हायरस चे रुग्ण रात्रंदिवस झपाट्याने वाढत आहेत यासाठी शासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी ग्रामीण पातळीवरील सर्व सरकारी कर्मचारी यांनी आहे त्या गावांमध्ये मुख्यालयी थांबण्याचे आदेश मा जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत परंतु पाडळसे गावातील ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, तलाठी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, कर्मचारी, महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे कर्मचारी अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह पाडळसे गावातील विविध शासकीय कर्मचारी गावात न राहता बाहेरगावाहून अपडाऊन करत आहेत किमान कोरोना महामारी मध्ये तरी शासकीय कर्मचाऱ्यांनी पाडळसे गावांमध्ये रहिवास करून आपले कर्तव्य पार पाडावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे






