चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
लासुर येथे प्रथम एज्युकेशन फौंडेशन व लासुर ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्रातील कोल्हापुर व सांगली जिल्ह्यात पुर परिस्थितीमुळे तेथील लोकांवर खुप मोठे आपत्कालीन संकट ओढवले आहे. अनेक लोकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. पुरांमुळे नुकसान झालेल्या कुटुंबाना आधार मिळावा यासाठी आपल्या गावातून सुद्धा फुल नी फुलाची पाकळी या वृत्ती प्रमाणे लासुर बाजार चौकातील व्यावसायिक बंधू तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या कडून मदत रोख स्वरूपात रक्कम रु ५२००/- इतकी जमा झाली.
सदर जमा झालेली रक्कमेचा डी डी मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या नावाने तयार करून तहसीलदार अनिल गावित याच्या कडे सुपूर्द करण्यात आला.
सदर पूरग्रस्त कुटुंबासाठी मदत गोळा करणे साठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चोपडा येथील कम्युनिटी लीडर सुषमा सपकाळे,सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद माळी, ए वन क्लासेस चे संचालक राहुल पाटील, श्री संत सावता माळी युवक संघाचे खान्देश विभागीय अध्यक्ष जितेंद्र महाजन, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी, यश महाजन व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.







