Amalner: 32 गावांच्या अतिवृष्टी अनुदान भरपाई प्रश्न मा आमदार शिरीषदादा चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडला..!इतरांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये..इति शिरीषदादा मित्र परिवार..!
अमळनेर मतदार संघातील मारवड मंडळासह एकूण 32 गावांची जुलै व सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान भरपाई मिळण्यासाठी मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांनी मा ना श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य साहेब यांना दिनांक 01/08/2022 रोजी लेखी पत्रात मारवड मंडळासह 32 गावांना हेक्टरी 20 हजार 400 रु ऐवढा सानुग्रह नुकसान भरपाई देण्यात यावा अशी विनंती केली होती. त्यात असेही नमूद केले होते की शासकीय कर्मचारी यांच्या बेजबाबदारीमुळे अद्यापपावेतो सदर नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित आहेत असे लेखी पत्रात दिले होते, परंतु यात विद्यमान आमदारांना या भरपाई बाबत मारवडसह परिसरातील शेतकरी यांनी विचारणा केली असता त्यांचे उत्तर असायचे की हे अनुदान कुठल्याही परिस्थितीत मिळणार नाही, तसेच आता आमचे सरकार राहिले नाही मला वारंवार हा विषय विचारायचं नाही असे बेफिकीरपणे उत्तरे देत होते, त्याची प्रचिती ही मारवड गावकऱ्यांनी काही भूमिपूजनाप्रसंगी सदर भूमिपूजने ही होऊ दिले नाहीत.
याविषयी चर्चा करण्यासाठी माजी आमदार श्री दादा चौधरी यांनी याआधीही मारवड सह परिसरातील अभ्यासू शेतकरी गटांना प्रत्यक्ष मंत्रालयात सोबत घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची मिटींग लावण्यात आली. मारवड येथे प्रत्यक्ष भेटीत नागरिकांना मा आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांनी असे वचन दिले होते की कुठल्याही परिस्थितीत मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांना साकडे घालून सदर नुकसान भरपाई अनुदान मिळवून देईल असे वचन दिले होते याविषयी पाठपुराव्याची चर्चा ही मारवड येथील शेतकरी वर्गाशी संवाद करीत होते, याविषयी कोणी पाठपुरावा केला? कोणी याबद्दल दखल घेतली? कोण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे? हे सर्व्यांना माहीत आहे. सर्व शेतकरी वर्ग हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब आणि मा आ शिरीष दादा चौधरी जाहीर आभार व्यक्त केले आहे आणि शेतकरी गटाचे म्हणणे आहे की सरकार विरोधी आमदारांनी श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रकार करू नये यातून शेतकऱ्याची दिशाभूल करू नये.असे शिरीषदादा मित्र परिवाराचे मत आहे.






