Maharashtra

तळेगाव आरोग्य केंद्रासह परिसराचा नावलौकिक वाढविण्यात डाॅ प्रमोद सोनवणे यांचे योगदान जि प सदस्य अतुलदादा देशमुख यांचे प्रतिपादन.

तळेगाव आरोग्य केंद्रासह परिसराचा नावलौकिक वाढविण्यात डाॅ प्रमोद सोनवणे यांचे योगदान
 जि प सदस्य अतुलदादा देशमुख  यांचे प्रतिपादन.

तळेगाव आरोग्य केंद्रासह परिसराचा नावलौकिक वाढविण्यात डाॅ प्रमोद सोनवणे यांचे योगदान जि प सदस्य अतुलदादा देशमुख यांचे प्रतिपादन.

देशपातळीवर नंदुरबारचे नाव आरोग्य क्षेत्रात नेण्यासाठी डाॅ प्रमोद सोनवणे यांना प्रदिपदादा देशमुख यांचेकडून शुभेच्छा.
तळेगाव ता चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
आज प्रा आ केंद्र तळेगाव ता चाळीसगाव जि जळगाव येथ डाॅ प्रमोद सोनवणे यांची मोरांबा ता अक्कलकुवा जि नंदुरबार येथे बदली झाल्याने तळेगाव ग्रामस्थांच्या वतीने आरोग्य केंद्रातील व्दितीय वैद्यकीय अधिकारी  डाॅ आशा राजपुत, आरोग्य सहाय्यिका सौ सुनंदा महाजन,  आरोग्य सेवक विजय देशमुख तसेच शंकर मोरे यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. 
प्रसंगी चाळीसगाव तालुका व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ नेते प्रदिपदादा देशमुख अध्यक्षस्थानी होते. डाॅ प्रमोद सोनवणे यांचेमुळे गोरगरिबांना उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सेवा मिळू शकली, डाॅ आनंदीबाई जोशी पुरस्कार प्रा आ केंद्र तळेगावला मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे व *ते जिथे जातील तेथे संधीचे सोने करतील व नंदुरबारचेही नाव आरोग्य क्षेत्रात देशपातळीवर नेतील* असा विश्वास व्यक्त करून डाॅ प्रमोद सोनवणे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
जि प सदस्य अतुलदादा देशमुख यांनीही आरोग्य केंद्राचा व परिसराचा गौरव डाॅ प्रमोद सोनवणे व टिमच्या सातत्यपूर्ण कामगिरीनेच झाला असे नमूद केले.
तसेच शिकाऊ कालावधीत उत्कृष्ट  आरोग्य सेवेबद्दल पाटणादेवी येथील डाॅ अभिजित खर्चाणे यांचाही गौरव करण्यात आला.
*तळेगावचे सुपुत्र नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष सांगळे यांनीही डाॅ सोनवणे यांच्या कार्याचा गौरव केला. डाॅ सांगळे यांचेही यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.*  
सहाय्यक गटविकास अधिकारी अजितसिंह पवार यांनीही डाॅ प्रमोद सोनवणे व टिमच्या कार्याचा गौरव केला. 
 यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुलदादा देशमुख व प स सदस्य मा विष्णू चकोर सर,  सरपंच सौ सारिकाताई राठोड , वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष सांगळे, डाॅ आशा राजपुत , संतोष राठोड , ग्रामपंचायत सदस्य राजू शितोळे, भोजूशेठ जैन, गोरे आप्पा, पराग कासार, अनिल  राठोड, जितू निकम, अनिल पगारे, सचिन गायकवाड, सुभाष काकडे, एल सी जाधव, विठ्ठल चव्हाण,  पुष्पा शिनकर,  आदींसह ग्रामस्थ,  आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते. 
सुञसंचालन अनिल पगारे यांनी केले.
डाॅ सोनवणे व डाॅ राजपुत यांनी सर्वोत्तम आरोग्य दिल्याने लोकांमध्ये 
बदली झाल्याने भावुक वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थ व  लोकांसह कर्मचारी व आशांचे डोळे पाणावले होते.?????

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button