sawada

सावदा पोलीस स्टेशनात ठाणे अंमलदार कक्षाचा जळगांव पोलीस अधीक्षक डॉ.मुंडेंच्या हस्ते शुभारंभ

सावदा पोलीस स्टेशनात ठाणे अंमलदार कक्षाचा जळगांव पोलीस अधीक्षक डॉ.मुंडेंच्या हस्ते शुभारंभ

युसूफ शाह सावदा

सावदा : सावदा येथील पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अंमलदार यांना त्यांचे काम सुव्यवस्थित करीता यावे यासाठी येथील जनतेच्या सहकार्याने पोलीस अंमलदार कक्षाची उभारणी करण्यात आली. या कक्षाचा शुभारंभ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढ़े यांचे हस्ते आज दि. १/६/२०२१ रोजी करण्यात आला

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सावदा पो.स्टे.चे. कर्तव्यदक्ष स.पो.नी. देवीदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र डी पवार, तसेच ज्यांनी या कक्षाचे उभारणीस मदत केली असे उत्कृष्ट शेतकरी व समाजसेवक किशोर पाटील मोठा वाघोदा, यांचेसह मान्यवर उपस्थित होते, यावेळी मान्यवरांचे हस्ते पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले. सदर सर्व कार्यक्रम अतिशय छोटेखानी तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळुन करण्यात पार पाडण्यात आला
यावेळी पत्रकारांशी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढ़े यांनी सावदा येथे कोरोना नियम पाळण्यात येतात हे पाहुन समाधान वाटले सर्व नागरिकांनी नियम पाळा, व शासनास सहकार्य करा असे सांगितले. तर सावदा सह इतर ठिकाणी पोलीस वसाहती बाबत विचारले असता त्यांनी जिल्ह्यात अनेक ठीकाणी पोलीस वसाहतीचा प्रश्न असून तो लवकरच कोरोना परिस्थिति सुधारल्यावर मार्गी लाऊ असे सांगितले. तर अपूर्ण पोलीस बळा बाबतीत त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात सुमारे अडीच वर्षा पासून पोलीस भरती झालेली नाही ती लवकरच होईल व अधिकची पोलीस कुमक उपलब्ध होईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button