Bollywood

विकी आणि कतरीना चा रोका सोहळा संपन्न..!दोघांचे कुटुंबीय उपस्थित..!

विकी आणि कतरीना चा रोका सोहळा संपन्न..!दोघांचे कुटुंबीय उपस्थित..!

मुंबई बॉलिवूड अभिनेते विकी कौशल आणि कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली असून कबीर खान आणि मिनी माथूर यांच्या घरी या दोघांचा रोका सोहळा नुकताच पार पडला. कतरिनाने कबीर खानसोबत न्यूयॉर्क आणि एक था टायगर सारख्या चित्रपटात काम केलं आहे आणि ती त्याला आपला भाऊ मानते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा विवाह सोहळा संपन्न होईल.

ह्या रोका सोहळ्यात फक्त दोघांचं कुटुंबीय उपस्थित होते. ज्यात कतरिनाची आई सुजैन, तिची बहीण इसाबेल, विकीचे आई-वडील शाम आणि वीणा कौशल आणि भाऊ सनी उपस्थित होते.
विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबरमध्ये राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. कतरिनाला टायगर 3 चं शूटिंग पुन्हा सुरू करावं लागणार आहे आणि विकी सॅम माणेकशॉच्या बायोपिक सॅम बहादूरवर काम सुरू करणार आहे.
कॅट आणि विकीने आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button