India

तिकीट काढलं नाही ?घाईत रेल्वे पकडली?घाबरू नका हे करा

तिकीट काढलं नाही ?घाईत रेल्वे पकडली?घाबरू नका हे करा..

जयश्री साळुंके

कामासाठी उशीर झाल्यास आपण कधी कधी असेच विना तिकिट प्रवास करण्याचा निर्णय घेतो. पण मनात टीसी ने पकडले तर काय होईल अशी सारखी धाकधूक चालू असते. त्यात भारतीय लोकसंख्या इतकी वाढली आहे की करोडो लोक रोज रेल्वेने प्रवास करत असतात. परिणामी तिकीट खिडकीवर भली मोठी रांग लागलेली असते. मग बहुतांश वेळा लोक विना तिकीट प्रवास करण्याचा मार्ग अवलंबत असतात. यामध्ये ज्यांना तिकीट परवडत नाही अशांची संख्या जास्त असते. त्याचप्रमाणे कधीकधी घाईघाईत रेल्वे तिकीट गहाळ होते. आणि नेमके त्याच दिवशी टीसी पकडतो आणि अव्वाच्या सव्वा दंडाची रक्कम वसूल करतो त्यामुळे नक्कीच त्रेधा तिरपीट उडते. लोकांना तिकिटे मिळत नाहीत आणि टीसीने जास्त दंडाची रक्कम घेतल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे, आतापर्यंत बरीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यामध्ये टीसीद्वारे लोकांकडून अवैध बंदोबस्त केला जात आहेत, परंतु आता असे होणार नाही, भारतीय रेल्वेने अलीकडे अशी सुविधा सुरू केली आहे ज्याद्वारे तुम्ही ट्रेनमध्येही तिकिटे काढू शकता.

लोक तिकीट न घेता घाईत ट्रेनमध्ये चढतात आणि त्यानंतर त्यांना भीती वाटते की जर टीसीने पकडले तर तुम्हाला भरपूर दंड भरावा लागेल, पण आता असे झाल्यास तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही कारण भारतीय रेल्वे मंत्रालयाने एक नवी घोषणा केली आहे. ह्या घोषणेनुसार तुम्हाला घाई असल्यास व तुम्ही तिकीट खिडकीवर तिकीट काढू न शकलात तर रेल्वेमध्येच तिकिट घेऊ शकतात.
रेल्वेचे तिकिट नसल्यास काय करावे
जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्ही १० रुपये अतिरिक्त फी भरून टीसीकडून तिकिट घेऊ शकता. त्यासाठी टीसीला एक मशीन दिले गेले आहे ज्याद्वारे तो तुम्हाला जिथे जायचे आहे त्या ठिकाणच्या तिकीट रक्कमे प्रमाणे तुमच्याकडून भाडे घेऊन तिकीट देऊ शकेल.

हे हेलड मशीन रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणालीच्या सर्व्हरशी कनेक्ट आहे. सध्या ही सुविधा फक्त सुपरफास्ट गाड्यांसाठी सुरू करण्यात आली आहे, परंतु लवकरच इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरू केली जाईल. त्यामुळे घाईने अनेकदा रेल्वेचे तिकीट घेण्यास विसरलात किंवा तिकीट गहाळ झाले अशा प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुम्ही तिकीट न काढता घाई घाईत ट्रेनमध्ये चढलात तर तुम्हाला तिकीट तपासणी करण्यापूर्वी टीसीशी संपर्क साधावा लागेल आणि टीसी ला योग्य ते कारण देऊन त्यांच्याकडून अतिरिक्त १० रु देऊन तिकिट घ्यावी लागेल, तिकिट तपासणी दरम्यान जर तुम्ही पकडले गेलात तर मात्र तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. मग मात्र तुम्हाला दंड भरावा लागेल, म्हणून जर आपल्याला दंड टाळायचा असेल तर ट्रेनमध्ये जाताना टीसीकडून तिकिट घ्यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button