Amalner

Amalner: भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पदी भैरवी वाघ-पलांडे यांची निवड..क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून मिळाली बढती

Amalner: भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पदी भैरवी वाघ-पलांडे यांची निवड..क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून मिळाली बढती

अमळनेरः- भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका सौ. भैरवी वाघ-पलांडे यांची कामाची पावती म्हणून बढती करत प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली आहे.

आर्किटेक्ट भैरवी यांनी महाविद्यालयीन काळात जळगाव येथे अभाविपच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत सक्रीय सहभाग घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चामधील महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांच्याकडे पुणे महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती.त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश सचिव म्हणून जवाबदारी देण्यात आली होती.पक्ष संघटनेत त्यांची कारकीर्द अधिकच उज्वल राहिल्याने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मोठी जवाबदारी देण्यात आली आहे.

भैरवी या माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ व स्व.उदय वाघ यांच्या कन्या असून पुणे येथील सौ. जयश्री व अ‍ॅड अशोकराव पलांडे यांच्या स्नूषा आहेत. भैरवी अपूर्व पलांडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे,राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन,जळगांव खासदार उन्मेषजी पाटील,रावेर खासदार रक्षाताई खडसे, जळगांव आमदार राजूमामा भोळे, चाळीसगाव आमदार मंगेशजी चव्हाण, भुसावळ आमदार संजयजी सावकारे,विभाग संघटन मंत्री रविजी अनासपुरे,जळगांव पश्चिम जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज,जळगांव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोलजी जावळे, महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button