Bollywood

Mollywood: खेळ कुणाला दैवाचा कळला…!

Mollywood: खेळ कुणाला दैवाचा कळला…!

मराठी चित्रपटसृष्टीचा ‘हँडसम हिरो’ अशी ओळख मिळवलेले प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आंबी येथे एका बंद खोलीत ते मृतावस्थेत सापडले. शुक्रवारी शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने रात्री पाहिले असता, त्यांचा मृतदेह आढळला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अभिनेते रवींद्र महाजनी आंबी येथील घरात एकटेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. महाजनींच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. मराठी सिनेविश्वालाही मोठा धक्का बसला आहे.
रवींद्र महाजनी यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात मोठा काळ गाजवला आहे. त्यांना मराठी मनोरंजन विश्वातील विनोद खन्ना असंही म्हटलं जाई. अशा या हँडसम हिरोचा चाहतावर्गही मोठा होता. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या महाजनींवर एकेकाळी फसवणूक, कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटांचा सामना केला आहे.
अभिनय क्षेत्राच्या जोडीला एखादं उत्पन्नाचं साधन असावं, म्हणून रवींद्र महाजनी यांनी व्यवसाय विश्वात पाऊल ठेवायचं ठरवलं होतं. त्यांनी बांधकाम क्षेत्रात भागिदारी केली. परंतु त्यांची मोठी फसवणूक झाली. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. राहत्या घरावरही जप्ती आली.

त्या काळात त्यांचा सुपुत्र-अभिनेता गश्मीर महाजनी अवघ्या १५ वर्षांचा होता. त्याची आई अर्थात रवींद्र महाजनींची पत्नीही त्यावेळी कमी पगाराची नोकरी करत होती.

अशावेळी गश्मीर कुटुंबासाठी भक्कमपणे उभा राहिला. गश्मीरने घराचा आर्थिक भार खांद्यावर पेलला. कर्ज दूर करण्यासाठी त्याने स्वतःची डान्स अकादमी सुरु केली.

मला समई दिली, सुबोध भावे सुलोचना दीदींच्या आठवणीत भावुक
गश्मीर त्यावेळी अवघ्या १५ वर्षांचा होता. पैसे कमवण्यासाठी नाटक-सिनेमात मिळेल ती भूमिका करण्याचं त्याने ठरवलं. अवघ्या दोनच वर्षांत गश्मीरने डान्स अकॅडमीचा जम बसवला आणि घरावरचं सगळं कर्ज फेडून टाकलं. आपल्या कुटुंबाला संकटातून सहीसलामत बाहेर काढलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button