Erandol

कल्पना हॉस्पिटलचे डॉ. राहुल पाटील व डॉ स्नेहल पाटील यांच्या रुग्णसेवा कार्याचा गौरव..

कल्पना हॉस्पिटलचे डॉ. राहुल पाटील व डॉ स्नेहल पाटील यांच्या रुग्णसेवा कार्याचा गौरव..
कल्पना हॉस्पिटलचे डॉ. राहुल पाटील व डॉ स्नेहल पाटील यांच्या रुग्णसेवा कार्याचा गौरव..

 

एरंडोल –  प्रतिनिधी विक्की खोकरे
नॅशनल क्रमांक 6 हायवे वर रात्री-बेरात्री केव्हाही अपघात होत असतात तेव्हा तात्काळ अपघातील जखमींना नॅशनल हायवे जवळ असलेल्या कल्पना हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात येते ..
अशा वेळेस अपघातग्रस्तांच्या जवळ कोणतेही नातेवाईक असो किंवा पैसे नसो परंतु अश्या परिस्थितीत एरंडोल येथील कल्पना हॉस्पिटलचे डॉ.राहूल पाटील व डॉ स्नेहल पाटील हे मानवतेच्या धर्मातून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करतात त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी नेहमी धावपळ करत असतात ..
अहोरात्र दोन्ही जोडपे न थकता वैद्यकीय सेवा देत पिडीत रुग्णाना महत्वाची सेवा करत असतात .
या माध्यमातून त्यांच्या या सेवाभाव वृत्तीच्या सन्मान म्हणून एरंडोल शहरातील लोकराज्य 24 न्यूज चैनलच्या वतीने डॉ. राहुल पाटील डॉ.स्नेहल पाटील यांच्या रुग्णसेवेचा नुकताच गौरव करण्यात आला..
 लोकराज्य 24 न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक व रुग्णसेवक विक्की खोकरे, न्युज चॅनलचे मार्गदर्शक श्री फकीरा खोकरे ,पत्रकार प्रवीण पाटील आधी यांच्या हस्ते शाल व सन्मान पत्र देऊन त्यांच्या रुग्णसेवेचा गौरव करण्यात आला…!
त्याचा हातून अशाच प्रकारे पिडीत व गरजू रुग्णांची सेवा घडो असे मत श्री फकिरा खोकरे यांनी व्यक्त केले….!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button