Pandharpur

गोपाल काल्याने आषाढी यात्रेची सांगता गोपाळ कृष्ण मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडला गोपालकाला सर्व संतांच्या पालख्या परतीच्या मार्गावर

गोपाल काल्याने आषाढी यात्रेची सांगता गोपाळ कृष्ण मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडला गोपालकाला सर्व संतांच्या पालख्या परतीच्या मार्गावर


रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर देवशयनी एकादशीच्या आषाढी, सोहळ्यासाठी पंढरीत आलेल्या सर्व संतांच्या पालख्या आज पौर्णिमेनिमित्त गोपाळपूर येथील गोपाळ कृष्ण मंदिरात गोपाल काला व काल्याचे किर्तन साजरा करून गोपाळकाला गोड झाला गोपाळांनी गोड केला म्हणत उत्साहात गोपाळपूर येथे आषाढी यात्रेच्या सोहळ्याची सांगता करण्यात आली, यानंतर सर्व मानाच्या संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला लागल्या.
गोपाळपूर मंदिरामध्ये पहाटेपासूनच मानाच्या पालख्यांचे आगमन होऊ लागले यानंतर मंदिरात रितीरिवाजा प्रमाणे पूजाअर्चा करण्यात आली. व परंपरेची दहीहंडी फोडण्यात आली कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासकीय नियम पाळत आज हा सोहळा उत्साहात साजरा झाला यावेळी हरिनामाचा गजर टाळ मृदुंगाच्या निनादाने अवघी गोपाळपूर नगरी दुमदुमून गेली होती.
श्री.संत तुकाराम महाराज,
श्री.संत ज्ञानेश्वर महाराज,
श्री.संत नामदेव महाराज,
श्री.संत एकनाथ महाराज, श्री. संत सोपान महाराज, श्री.निवृत्ती महाराज,
श्री.संत चांगावाटेश्वर महाराज, श्री.संत मुक्ताबाई या मनाच्या संतांच्या पालखेड चे किर्तन भजन झाले.
गोपाळकृष्ण मंदिरासमोरच हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला गोपाल काळा गोड झाला गोपालाने गोड केला म्हणत सर्वांनी एकमेकांना प्रसाद वाटप करून गोपाल काळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी प्रशासनाचे अधिकारी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच पोलिस पाटील व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. “जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥” म्हणत
सोहळा पार पडला. आलेले भाविक पालखी दिंडीतील वारकरी यांनी विठ्ठलाचे रूप मनामध्ये आवळून पंढरीचा निरोप घेतला यानुसार सर्व पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button