Mumbai

बॉलिवूड लवकरच बिग बॉस 13 कलर्स वाहिनी वर होईल सुरू…पहा कोण आहेत कंटेस्टंट ….ग्लॅमरस आणि चर्चित असतील खेळाडू ….

बॉलिवूड
लवकरच बिग बॉस 13 कलर्स वाहिनी वर होईल सुरू…पहा कोण आहेत कंटेस्टंट ….ग्लॅमरस आणि चर्चित असतील खेळाडू ….

बॉलिवूड लवकरच बिग बॉस 13 कलर्स वाहिनी वर होईल सुरू...पहा कोण आहेत कंटेस्टंट ....ग्लॅमरस आणि चर्चित असतील खेळाडू ....

मुंबई वृत्त – 
बिगबॉस १३ चा लवकरच सुरु होणार आहे नुकतेच सलमान खान ने या बाबतची घोषणा केली. ट्रेन मध्ये ही घोषणा करताना सलमान खान म्हणाला या वेळी सगळं फास्ट होणार आहे. या वेळी बिग बॉस मध्ये या यांची एंट्री निश्चित मानली जात आहे.
लाडकी सून…
सगळ्यांची आवडती गोपी सून ही बिग बॉसमध्ये दिसून येणार आहे. देओलीना भट्टाचार्जी असे या अभिनेत्रीचे नाव आहे. देवोलिनाची एंट्री बिग बॉसमध्ये निश्चित मानली जात आहे कारण ती प्रोमो व्हिडीओ रिलीझ मध्ये सुद्धा दिसून आली होती.
गोविंदाची भाची….
गोंविंदाची भाची आरती सिह सुद्धा या सिझन मध्ये दिसणार आहे. नुकतीच आरती एका आलिशान पार्टीमध्ये दिसून आली होती अशी चर्चा आहे की बिग बॉसच्या घरात जाण्याआधी आरती ने आपल्या मित्रांसोबत ही पार्टी केली.
नागिन मालिकेची अभिनेत्री…
टीव्ही शो नागीण ३ मध्ये चेटकिणीचे काम करणारी महिरा शर्माची सुद्धा या कार्यक्रमात एंट्री होणार आहे. माहिरासाठी हा एक मोठा ब्रेक मानला जातोय.
फॅशन आणि ग्लॅमरस…
फॅशन फेम आणि अनेक हिंदी चित्रपटांमधून झळकलेले मुग्धा गोडसे सुद्धा बिग बॉसच्या घरात आपले नशीब आजमावणार आहे. मुग्धा ने फॅशन, हिरोईन सारख्या अनेक नावाजलेल्या चित्रपटांमधून अभिनय केला आहे.
उतरन फेम…
 अभिनेत्री रश्मी देसाईने टीव्ही जगतात बरेच नाव कमावले आहे. रश्मी आपल्या खाजगी आयुष्यबाबत अनेकदा चर्चेत राहिलेली आहे. आता ती बिग बॉससाठी सज्ज झाली आहे.
बालिका वधु फेम.
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसमध्ये येणार आहे याचा एक प्रोमो सुद्धा नुकताच आला आहे. सिद्धार्थ गोविंदाची भाची आरतीला डेट करत असल्याची चर्चा आहे आता यांच्या केमिस्ट्रीची मजा बिग बॉसच्या घरातच पहायला मिळणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button