Chimur

नेरी – बोडधा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक एक गंभीर जखमी

नेरी – बोडधा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक
एक गंभीर जखमी

चिमूरप्रतीनीधी – ज्ञानेश्वर जुमनाके

नेरी वरून जवळ असलेल्या नेरी – बोडधा रोडवर २६ फेब्रुवारी सकाळी ९ .३० वाजताच्या दरम्यान दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक गंभीर जखमी तर तीघे कीरकोळ जखमी झालेले आहेत .

नेरी - बोडधा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक एक गंभीर जखमीदेवानंद अंंबादास पोईनकर ,वय १९ वर्ष , रा.शीवणपायली ( गंभीर जखमी ) , पुनम देवीदास बोरकर , वय १७ वर्ष रा.शीवणपायली हे नेरीला येत होते . तर दीपक नन्नावरे , रा. उसेगांव , वय २३ वर्ष , अशोक दोडके ,वय ४५ – वर्ष , हे लोहाऱ्याला जात असतानी बोडधा रोडवर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
शीवनपायली येथील नागरीकांना या घटनेची माहीती होताच तात्काळ घटनास्थळी पोहचले .या जखमीना नेरी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रांत आणले . येथील देवानंद पोईनकर याला चीमुर उपजील्हा रूग्णालय येथे रेफर करण्यात आले . चीमुर येथुनही जील्हा रुग्णालय चंद्रपुर येथे हलवीण्यात आले . त्याची प्रक्रुती चीतांजनक आहे . दीपक नन्नावरे सुध्दा चीमुर उपजील्हा रूग्णालय येथे उपचार सुरू आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button