खानापूर येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2019-20 समूह पंक्ती प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर
कृषी विज्ञान केंद्र,पाल मार्फत रावेर तालुक्यातील खानापूर येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2019-20 समूह पंक्ती प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम अंतर्गत हरभरा पीक क्षेत्र भेट व निविष्ठा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.या प्रसंगी लाभार्थी शेतकऱ्यांना कीडनियंत्रणासाठी कीडनाशके निविष्ठा म्हणून वाटप करण्यात आले.व्यासपीठावर कार्यक्रम अध्यक्ष के व्ही के चे प्रभारी प्रमुख श्री.संजय महाजन उपस्थित होते,कमी खर्चातील तंत्रज्ञान अवगत करून अधिक उत्पादन घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.तांत्रिक मार्गदर्शन करतांना श्री.महेश वि महाजन (शास्त्रज्ञ- पीक सरंक्षण) यांनी हरभरा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन बाबत माहिती दिली. एकूण 25 एकर क्षेत्रावर प्रकल्प राबविला आहे या मध्ये बियाणे ,कीडनाशके व इतर निविष्ठा पुरविण्यात आल्या असून एकात्मिक पीक व्यवस्थापन या तंत्रज्ञानवर आधारित आहे.या कार्यक्रमास महिला लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज कोळी यांनी मेहनत घेतली.