Nashik

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडून १ लाख २० हजारांचा धनादेश ना.छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्त

नाशिक -मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडून १ लाख २० हजारांचा धनादेश ना.छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्त

नाशिक शांताराम दुनबळे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत विविध संस्था संघटनाकडून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्यात येत आहे. आज नाशिक महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख २० हजार रुपयांचा धनादेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्त केला.

यावेळी मनपा गटनेते गजानन शेलार, गुरुमित बग्गा, राजेंद्र महाले,समिना मेमन, सुषमा पगारे, शोभा साबळे,जगदीश पवार,आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button