Maharashtra

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तपसे चिंचोली येथे खरीप हंगामपूर्व चर्चासत्र संपन्न

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तपसे चिंचोली येथे खरीप हंगामपूर्व चर्चासत्र संपन्न

औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे खरीप हंगामाच्या पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना सोशल डिस्टन्स ठेवून चर्चासत्र दिनांक २जून २०२० रोजी आयोजित करण्यात आले होते.. यावेळी कृषी पर्यवेक्षक तथा प्रभारी मंडळ कृषी अधिकारी श्री. पिनाटे ए.के. यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या निरनिराळ्या योजने बाबत सविस्तर मार्गदर्शन व शेतकऱ्यांचसोबत चर्चा केली. मशागतीच्या पद्धती, जमिनीचे आरोग्य, माती तपासणीचे महत्व, जमिनीची धूप थांबविणे,तसेच घरगुती पद्धतीने सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासण्याचे प्रात्यक्षिक,खरिपामध्ये बियाणे खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी तसेच गटाच्या माध्यमातून बियाणे खरेदी करणे इत्यादींची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक श्री. एम. जी. वाघमारे यांनी दिली. गांडूळ खत उत्पादन , हिरवळीचे खत, नॅडेप खत, फळबाग लागवड योजना इत्यादींविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीच्या बाबतीत श्री कातळे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा बनविणे व त्या वापर करण्याच्या पद्धती याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शेतकरी
मारुती नेटके (माजी सरपंच), सोमेश पाटील(उपसरपंच) , बालाजी शिंदे,विनायक लादे,खंडू नेटके, अमीन शेख,राजेश्वर गुरव,गोरख नेटके, संतोष बिराजदार, बालाजी कवठाळे,मनोहर यादव,प्रवीण नेटके, संजय बेरड,दीपक नेटके ,आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button