अॅगलो उर्दू हायस्कुल सावदा येथील शालेय पोषण आहाराचे वीस क्विंटल तांदूळ विक्री..जनहीत तक्रार दाखल
अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव येथे शालेय पोषण आहाराचे जवळपास वीस क्विंटल तांदूळ विक्री केले बाबत जनहित तक्रार
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा ता रावेर जि जळगाव येथील अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेची एकुण 15 ते 20 क्विंटल तांदूळ जाणिव पुर्वक पणे मनमानी करून विक्री करण्यात आले आहे अशी चर्चा गावात 20 दिवसा पासून जोर धरत आहे. या बाबत असे कि जवळपास दिवसा पुर्वी सावदा ता रावेर जि जळगाव येथील अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेने विद्यार्थ्यांसाठी आलेला तांदूळ खुल्या बाजारात विकले आहे असे आशिया चे तक्रार अर्ज मा. अधिक्षक शालेय पोषण आहार रावेर यांना समक्ष भेटून शेख फरीद शेख नुरोद्दिन यांनी दिले. तसेच मा. मुख्यकार्यकारी साहेब जि. प. जळगांव,मा.शिक्षणाधिकारी साहेब जळगांव व मा. संचालक साहेब पुणे यांना इ मेल द्वारे तक्रार अर्ज पाठवले आहे. तक्रार अर्जाची दखल न घेतल्याने आज रोजी व्हिडिओ तयार केले आहे जेणेकरुन दखल घेऊन चौकशी व पंचनामा करावा. अशी मांगणी करण्यात आली आहे.






