Mumbai

कोल्हापूर, सांगली,सातारा जिल्ह्यात आलेल्या महापुराची राज्य मानवी हक्क आयोग,मुंबई यांनी घेतली दखल

कोल्हापूर, सांगली,सातारा जिल्ह्यात आलेल्या महापुराची राज्य मानवी हक्क आयोग,मुंबई यांनी घेतली दखल

कोल्हापूर, सांगली,सातारा जिल्ह्यात आलेल्या महापुराची ह्यूमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन ने केलेल्या तक्रारीची राज्य मानवी हक्क आयोग,मुंबई यांनी घेतली दखल

राजेश सोनुने

कोल्हापूर, सांगली,सातारा जिल्ह्यात
ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरात तत्कालीन प्रशासनाने दिरंगाई केल्याने झालेल्या जीवितहानी,वित्तहानी मुळे नुकसान झाले या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी तक्रार ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.एम. डी. चौधरी यांनी राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथे तक्रार दाखल केली होती,आयोगाने याची दखल घेऊन 17 जानेवारी 2020 रोजी विभागीय आयुक्त पुणे,व जलसंपदा विभाग मुंबई याना हजर राहण्याचे समन्स बजावले असून तत्कालीन प्रशासनाने दिरंगाई केल्याने जीवित,वित्तहानी झाली ,अनेक कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य,महत्वाची कागदपत्रे पुरात वाहून गेले ,शेतीचे नुकसान तसेच अनेक लोकांना जीव गमवावा लागला,अनेक जनावरे मृत्युमुखी पडली खूप मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले त्यामुळे पुरग्रस्त लोकांना न्याय मिळावा अशी मागणीची तक्रार राज्य मानवी हक्क आयोगाकडे केली होती अशी माहिती ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे कोल्हापुर जिल्हाध्यक्ष श्री. इचलकरंजीकर आय.जे. यांनी दिली.

कोल्हापूर, सांगली,सातारा जिल्ह्यात आलेल्या महापुराची राज्य मानवी हक्क आयोग,मुंबई यांनी घेतली दखलयासाठी ह्यूमन राईट्स चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.एम. डी. चौधरी,राष्ट्रीय प्रवक्ता श्री.संतोष कदम,पश्चिम महाराष्ट्र जनसम्पर्क अधिकारी श्री.प्रशांत कदम, कोल्हापुर जिल्हाध्यक्ष श्री. इचलकरंजीकर आय.जे. जिल्हा कार्याध्यक्ष डॉ प्रशांत माने जिल्हा उपाध्यक्ष श्री.मानिक भंडारी जिल्हा संघटक श्री.विनोद पवार जिल्हा जनसंपर्क अधिकारी श्री.आप्पासाहेब कोकितकर, सांगली जिल्हाध्यक्ष श्री.दीपक भोसले,उपाध्यक्ष डॉ दीपक सरनाईक,जिल्हा संघटक श्री.रमेश लाड,जिल्हा जनसम्पर्क अधिकारी श्री.शशिकांत कांबळे तसेच ह्यूमन राइट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे सर्व पदाधिकारी व कार्यकरते यांनी याविषयी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button