Aurangabad

वाघोदा येथील कमलाकर माळी यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान

वाघोदा येथील कमलाकर माळी यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान

मुबारक तडवी औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद येथील लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था औरंगाबाद यांच्या तर्फे सु- लक्ष्मी सेवाभावी संस्था व त्यांचे सदस्य वाघोदा येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर माळी यांना मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथील सभागृहात राष्ट्रीय गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था यांच्या २२ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र असे होते.हा पुरस्कार सोहळा दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी औरंगाबाद येथे मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अतुल सावे,पोलीस उपनिरीक्षक दिलिप जाधव डॉक्टर प्रमोद वाचस्पति राष्ट्रीय अध्यक्ष आदि उपस्थित होते.व कार्यक्रमाचे आयोजक संस्थेच्या अध्यक्षा अर्चना मेडेवार व सचीव सिमा गुंडेळे यादिंनी परीश्रम घेतले, ह्या पुरस्कार मिळाल्याने कमलाकर माळी यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button