मा आ चा रोस्कारांची ऑक्सीजन व रेमदी सी वर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामीण भागात रेमडीसीवर व ऑक्सीजन साठा ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तत्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी शासनाकडे केली असून दिंडोरी तालुक्यासह मतदार संघातील करोना रुग्णांचे हाल थांबविण्या साठी त्यांनी मागणी केली आहे.
सध्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही करोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याने खाटा अपुर्या पडू लागल्या आहेत. दिंडोरी शहरात खाजगी रुग्णालयामध्ये जागा शिल्लक नाही तर इतर कोविड सेंटरमध्येही रुग्णांना वाट पाहवी लागत आहे. करोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने अगोदरच सज्जता ठेवायला हवी होती. सध्या दिंडोरी शहरात कोविड रुग्णालय स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दिशेने शहरातील तीन ते चार जागा पाहणी करुन एका ठिकाणी तात्काळ रुग्णालय सुरू करावे. दुसरीकडे रेमडीसीवर हे इंजेक्शन नातलगांनाच आणावे लागत आहे. खाजगी कोविड सेंटरचे डॉक्टर नकार देत असून नातेवाईकांनाच इंजेक्शन शोधायला लावत आहे. त्यामुळे नातेवाईक पुर्ण हतबल झाले आहे तसेच मनमानी भावाने मिळाले तर नाईलाज म्हणून खरेदी करावे लागते आहे. याकामी जिल्हाधिकार्यांनी तातडीने लक्ष घालून खाजगी डॉक्टरांना गतीमान करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय यंत्रणेने ग्रामीण जनतेचे हाल थांबवावे, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.






