गलवाडे येथून चोरट्यानी केली मोटारसायकल लंपास अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल…
नूरखान
अमळनेर :- तालुक्यातील गलवाडे येथे रात्रीतून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नितीन भास्कर पाटील हे गलवाडे येथे राहत असून अमळनेर बस स्थानकात चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मालकीची हीरो एचएफ डिलक्स कंपनीची MH १९ CM २८१४ क्रमांकाची अंदाजे २० हजार रुपयांची मोटारसायकल ही दि. ४ रोजी नेहमीप्रमाणे अंगणात लावली होती. दि. ५ रोजी फिर्यादी यांना बाहेरगावी जायचे असल्याकारणाने ते सकाळी ३:३० वाजता उठले असता त्यांना मोटारसायकल अंगणात आढळून आली नाही. त्यांनी आजूबाजूला तपास केला मात्र मोटारसायकल कोठेही आढळून न आल्याने त्यांनी मारवड पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार रोहिदास जाधव हे करीत आहेत.






