पारोळा शहरातून गुटखा पोहचतोय अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात बहदरपूर,इंधवा, कवपिंप्री मार्गे होतेय वाहतून
रजनीकांत पाटील
अमळनेर : जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले असता देखील कोरोना अमळनेर तालुक्यात येऊन ठेपला असून देखील अद्यापही नागरी कुठलीही सुरक्षा बाळगतांना दिसत नाही अशा बिकट परिस्थितीत सर्रास अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गुटख्याची विक्री सुरू आहे अमळनेर शहरात गुटखा मिळत नसल्याने मात्र ग्रामीण भागात विक्री सुरू आहे या बाबत गुटखा हा पारोळा तालुक्यातुन येत असून बहादरपूर,इंधवा मार्गे येत असल्याचे सत्र सुरू आहे या बाबत सुमठाने ते कवपिंप्री मधोमध तालुका हद्द असताना देखील गुटखा कसा काय पुढील खेड्यांपर्यंत पोहचतो या मागे कोणाचा आशिर्वाद आहे. रस्त्यालगत असलेल्या गावातील दुकानदार चोरी छुपे गुटखा विक्री होत असुन दुकानदारांची चांगलीच चांदी होतांना दिसत आहे चोरट्यां मार्गचा देखील वापर होतांना दिसत आहे दोन दिवसापूर्वी गुटखा घेऊन जात असलेली कार बहादरपूर येते पोलीस पाटील यांनी अडवून पोलिसांच्या हवाली केली.
या नंतर देखील चोरी छुपे वाहतूक चालू असल्याची चर्चा जोमाने आहे या मार्गावर पोलीस प्रशासनाने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे.






