Maharashtra

आदित्य ठाकरे आले आणि भुर्रकन उडून गेले

आदित्य ठाकरे आले आणि भुर्रकन उडून गेले

आदित्य ठाकरे आले आणि भुर्रकन उडून गेले

अमळनेर येथे आज आदित्य ठाकरे येणार आणि तरुणांशी संवाद साधणार,शेतकऱ्यांशी संवाद साधणार अश्या बातम्या सकाळ पासूनच नव्हे तर बऱ्याच दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी जवळ जवळ 3 तास प्रतीक्षा केल्या नंतर फक्त 3 मिनिटं थांबून आदित्य ठाकरे अमळनेर करांच्या तोंडाला पाने पुसून भुर्रकन निघून गेले.1995 मध्ये युती चे सरकार असताना पाडळसरे धरणाचे उद्घाघाटन झाले होते त्या अनुषंगाने दोन शब्द तरी दुष्काळ ग्रस्त भागासाठी बोलले जातील संवाद साधला जाईल अशी किमान अपेक्षा होती परंतु रस्त्यात येणाऱ्या एखाद्या छोट्या ठिकाणी बिनमह्त्वाच्या ठिकाणी जसे दोन मिनिटं थांबून “रात्रीचा आदित्य”गायब झाला असे म्हणावे लागेल. यावरून शिवसेना आणि पक्ष कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे कारण याच अमळनेर शहरात बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक सभा गाजली होती हे जाणकार विसरणार नाहीत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button