Maharashtra

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने जोपासली सामाजिक बांधिलकी – कोल्हापूर कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाचा मुकाबला

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने जोपासली सामाजिक बांधिलकी – कोल्हापूर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाचा मुकाबला

प्रतिनिधी तुकाराम पाटील

करण्यासाठी कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपला एक दिवसाचे वेतन सुमारे एक कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेतल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभय कुमार साळुंखे यांनी दिली. प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे म्हणाले आपल्या देशावर किंवा राज्यावर ज्यावेळी आपत्ती आलेली आहे त्यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत मदत केली आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी सामाजिक कार्याचा वसा घालून दिला आहे तो जोपासण्याचा काम आम्ही करीत आहोत.

आपल्या उत्पन्नातील वाटा सामाजिक कार्या करिता खर्च करणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. याच भावनेतून पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि भूकंपग्रस्त आधी लोकांसाठी आम्ही मदत केली आहे. अशी माहिती कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button