Maharashtra

चोपडा साखर कारखाना कडील थकित पेमेंटसाठी शिवसेनेच्या घंटानाद मोर्चा…

चोपडा साखर कारखाना कडील थकित पेमेंटसाठी शिवसेनेच्या घंटानाद मोर्चा…

चोपडा साखर कारखाना कडील थकित पेमेंटसाठी शिवसेनेच्या घंटानाद मोर्चा...

चोपडा(प्रतिनिधी सचिन जयस्वाल) 
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना कडील शेतकऱ्यांचे उसाचे थकित पेमेंटमिळावे यासाठी आज शिवसेनेच्या वतीने आज विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूनभाई गुजराथी यांच्या घरासमोर घंटानाद करण्यात आला व घोषणा बाजी करून पाच मिनिटात आंदोलकांना पोलिसांनी अटक करून मोर्चा संपवला यावेळी शिवसेनेचे प,स सदस्य भारत बाविस्कर, ऍड,एस, डी,सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, नगरसेवक भेय्या पवार, शहर प्रमुख आबा देशमुख, नरेंद्र महाजन, दीपक चोधरी, यांचा सह 40 ते 50 कार्यकर्ते उपस्थित होते.
 अरुणभाई गुजराथी म्हणाले की
कारखाना वाचवा ही आमची इच्छा आहे त्या आमचे प्रयत्न चालू आहे, लवकरच त्यांतन मार्ग काढून आम्ही शेतकरी व कारखान्यातील कामगार यांचे पैसे देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कारखाना वाचवा त्या करिता चार पर्याय आहेत त्यावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत .सेने तर्फे नेत्याचे कपडे फाडो आंदोलन विषयी बोलताना कपडे फाडो आंदोलन चोपड्याचा राजकारणातील संस्कृती नाही तरी असे काही घडल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याला समर्थ पणे प्रती उत्तर देतील . राजकीय हेतूने प्रेरित होऊन काढलेला घंटानाद मोर्चा निवडणुकीच्या संदर्भातील जूमला असल्याचे  अरुणभाई गुजराथी यांनी संगितले.यावेळी माजी आमदार जगदीश वळवि,चंद्रहास गुजराथी, जळगाव चे माजी महापौर किशोर पाटील, कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटिल, सौ, माधुरीताई पाटील, प्रवीण भाई गुजराथी यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button