Poltical Viral: हे माजी मुख्यमंत्री रोज रात्री परिधान करत असत साडी आणि ब्लाऊज…! हे होत विचित्र कारण
राजकारण आणि बॉलिवूड ही दोन्ही क्षेत्रे विचित्र तर असतातच पण खूप रहस्य विशिष्ट प्रकार देखील यात घडत असतात. भारतीय जनतेला देखील ह्या दोन क्षेत्रातील प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असतं. तर हा किस्सा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन टी रामाराव यांचा आहे.माजी मुख्यमंत्री एन टी रामाराव ह्यांनी अभिनय क्षेत्रा पासून त्यांच्या करियर ला सुरुवात केली. लहान पणापासून त्यांना अभिनयाची आवड होती.आणि पुढे ते राजकारणात सक्रिय झाले. एन टी रामाराव हे तेलगू चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेते होते. पुढे त्यांनी तेलगू देसम ह्या स्वतंत्र पक्षाची सुरुवात केली. व राज्याची सत्ता काबीज केली.1983 मध्ये तेलगू देसम ह्या पार्टीला बहुमत मिळाले आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यांना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा होती. एका ज्योतिषाच्या सांगण्यानुसार काही गोष्टी करायचे. ज्योतिषाच्या सांगण्यावरून एन टी रामाराव रोज रात्री महिलांचा सर्व साज शृंगार करायचे. त्यांनी अनेक चित्रपटांतून स्त्री पात्र देखील केली होती. शाळेच्या पहिल्याच नाटकात त्यांनी स्त्री पात्र केलं होतं. एन टी रामाराव हे आंध्र प्रदेश मध्ये प्रचंड लोकप्रिय होते. लोक त्यांना देव मानत असत. जनतेच्या ह्या प्रेमामुळेच त्यांना राजकारणातही यश मिळत गेलं. अभिनय क्षेत्रातून राजकारणात येऊन ही त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास हा थक्क करणारा असून आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व उपाय त्यांनी केले होते. पण त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली.






