Nashik

शरीर व मन सुदृढ होणासाठी संतुलित व पौष्टिक आहार घेणे ही काळाची गरज:- प्राचार्य रमेश वडजे

शरीर व मन सुदृढ होणासाठी संतुलित व पौष्टिक आहार घेणे ही काळाची गरज:- प्राचार्य रमेश वडजे

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
दिंडोरी-
प्रत्येकाचे शरीर व मन सुदृढ असेल तर शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होते व त्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार गरजेचा असल्याचे प्रतिपादन प्राचार्य रमेश वडजे यांनी केले.
राष्ट्रीय पोषण आहार माह सप्टेंबर २०२२ अंतर्गत आयोजित केलेल्या पोषण आहार जनजागृती कार्यक्रमात प्राचार्य रमेश वडजे हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्राचार्य
वडजे पुढे म्हणाले अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती याबाबी – शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. पौष्टिक आहार ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी जंक फूड फास्ट फूड पासून दूर राहून विविध पालेभाज्या फळे,दूध तूप पाणी यांचा योग्य वापर करून आपला सर्वांगीण विकास करावा असे प्रतिपादन त्यांनी केले
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य सोपान वाटपाडे,आरोग्य विभागाच्या डॉ. सुचिता कोशिरे,डॉ.समर्थ देशमुख,परिचारिका सोनाली वनवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय पोषण आहार समिती प्रमुख संतोष कथार यांनी केले.श्रीमती सुदर्शना गाजरे व कार्यक्रमाच्या डॉ.सुचिता कोशीरे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने यासर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट केले पाहिजे.या साठी घरातील मातेला पण पोषण आहाराचे महत्व पटून द्यावे असे त्यांनी सांगितले.उपप्राचार्य सोपान वाटपाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन दिले.
पोषण माह अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता ५वी ते ७वी च्या 120 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत व 80 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला.त्यापैकी प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पेन व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वर्गनिहाय सामुदायिक स्पर्धेत इयत्ता ५वी साठी कुरकुरीत पौष्टीक भेळ, इयत्ता ६वी व ७वी साठी पान,फुलं, पालेभाज्या,फळे यापासून आकर्षक मांडणी अश्या रचनांची स्पर्धा विद्यालयात घेण्यात आल्या.
या स्पर्धेत इयत्ता ५वी च्या वर्गातून प्रथम क्रमांक ५वी फ, द्वितीय क्रमांक ५वी ग तसेच इयत्ता ६वी च्या वर्गात प्रथम क्रमांक ६वी क, द्वितीय ६वी ई, इयत्ता ७वी च्या वर्गात प्रथम क्रमांक ७वी ई, द्वितीय- ७वी फ, या वर्गाने मिळविला या वर्गांना शालेय चार्ट, पेन व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे निरीक्षण व परीक्षण प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य सोपान वाटपाडे, श्रीम. ए.डी जाधव, श्रीम. ए.एन देशपांडे यांनी केले.निबंधस्पर्धा श्रीम.व्ही. बी. भामरे व श्रीम.के. पी.लाटे यांनी तर चित्रकला स्पर्धा श्रीम.डी. के.चव्हाण यांनी परीक्षण करून नियोजन केले.फलक लेखन श्री.एन.एम. जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. उत्कर्षा उशीर यांनी केले.पोषण आहार प्रतिज्ञा श्रीमती दिपाली चव्हाण यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या सह वदवून घेतली. आभार प्रदर्शन श्रीमती.रुपाली कुयटे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय पोषण आहार समिती, सर्व जेष्ठ शिक्षक, सर्व वर्गशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
फोटो- जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार माह सप्टेंबर कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य सोपान वाटपाडे, आदी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button