Amalner: धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी संचलित महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा…
अमळनेर: येथील धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान
महाविद्यालय, जय योगेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय व शांतीनिकेतन प्राथमिक विद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष तथा जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रावसो. के डी पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष नानासो डी डी पाटील,
आण्णासो.पांडुरंग पाटील, संचालक आबासो सुभाष पाटील सचिव राधेश्याम पाटील, संचालक नंदकुमार पाटील, संचालक शैलेंद्र पाटील, प्राचार्य डॉ प्रमोद पवार, संचालक प्रा. नयना पाटील, संचालक सौ. रेखा पाटील,शांतीनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर, प्राचार्य भरत सैंदाणे, फौजी नवनीत पाटील अनोरेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. जय योगेश्वर माध्यमिक
विद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी झेंडागीत,स्वागतगीत व देशभक्तीपर गीते सादर केले.
तसेच अतिशय सुंदररित्या लेझीम नृत्यही सादर केले.
शांतिनिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी “संदेशे आते है” या देशभक्तीपर गीतावर अतिशय
सुंदररित्या लेझीम नृत्याचे सादरीकरण केले.
अध्यक्षीय मनोगतात रावसाहेब के डी पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्र
निर्मितीसाठी चांगले कार्य, सामाजिकता, आरोग्य व पर्यावरण भान जोपासावे असे आवाहन केले. यावेळी नानासाहेब डी डी पाटील म्हणाले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मेहनतीने २ वर्ष ११ महिने १८ दिवसात घटना पूर्ण केली व देशाला बहाल केली आहे म्हणून आजचा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो, ही लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी देशात
आज वैचारिक परिवर्तनाची गरज आहे असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
यावेळी प्रा. अनिल पाटील प्रा. शैलेश पाटील, सुनिल जाधव, संजय सोनवणे, यशवंत
सुर्यवंशी यासह शांतीनिकेतन प्राथमिक,जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, चित्रकलामहाविद्यालय, आय टी आय चे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.






