Pune

औरंगाबाद जिल्ह्यातील भीषण रेल्वे दुर्घटनेत म्रुतकांचे कुटुंबास ५० लाख रुपये सानुग्रह द्या

औरंगाबाद जिल्ह्यातील भीषण रेल्वे दुर्घटनेत म्रुतकांचे कुटुंबास ५० लाख रुपये सानुग्रह द्या. प्रधानमंत्री, रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री यांना बिरसा क्रांती दलाच्या वतीने निवेदन.

पुणे / प्रतिनिधी – दिलीप आंबवणे

राज्यात औरंगाबाद जिल्ह्यात करमाळा जवळ सटाणा येथे भीषण रेल्वे दुर्घटनेत म्रुत पावलेल्यांच्या कुटुंबास प्रधानमंत्री गरीब कल्याण पँकेज अंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याची मागणी प्रधानमंत्री, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री यांचेकडे बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी, राज्य महासचिव प्रमोद घोडाम यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. अत्यंत दुःखद घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करुन जबाबदार असलेल्या जालन्यातील स्टील कंपनी वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन म्रुतांचे कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेत नौकरी देण्याचीही मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनात सुरुवातीलाच या अत्यंत भीषण रेल्वे दुर्घटनेत म्रुत पावलेल्या १६ आदिवासी मजूरांना संघटनेने विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहेत .
मध्यप्रदेशातील हे १६ मजूर जालना येथील एका स्टील कंपनीत कामाला होते. देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणतीही पूर्व सुचना वा संधी न मिळता अचानकपणे लाँकडाऊन झाल्यामुळे हे सर्व मजूर जालनात अडकून पडले. ते आपल्या मूळ गावी पोहचू शकले नाहीत. काही दिवसात लाँकडाऊन उघडले जाईल किंवा सरकार गावाला जाण्याची संधी उपलब्ध करुन देईल या आशेत त्यांनी बरेच दिवस घालविले परंतु लाँकडाऊन सतत वाढत गेले पण ब-याच दिवसापर्यंत मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारच्या वतीने संधी अथवा व्यवस्था करण्यात आली नव्हती.

या दरम्यान देशात लाँकडाऊन मुळे अडकलेले लाखोंच्या संख्येने असलेले मजूर अनवाणी पायाने, उन्हातान्हात हजोरो किलोमीटर पायी चालत आपला गाव जवळ करीत होते.या मजूरांचे दुर्दैव असे की,देशातील लाखो गरीब मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी संधी अथवा व्यवस्था केल्या जात नव्हती .याउलट परदेशात असलेल्या श्रीमंत व्यक्तींना मात्र विशेष विमाने देशात आणल्या जात होते.
तब्बल ४० दिवसानंतर जेव्हा देशाअंतर्गत राज्या-राज्यात अडकलेल्या मजूरांना गावी जाण्याची परवानगी व व्यवस्था झाली तेव्हा हे मजूर आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी घेऊन जावू लागले.

जालन्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील या १६ मजूरांनी आपल्या गावी जाण्यासाठी अशीच पास मिळवून देण्याची विनवणी आपल्या स्टील कंपनी मालकाला केली होती. पण त्यांनी पास मिळत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. ते मजूर आठवडाभर आपल्या कंपनी मालकाला पास मिळवून देण्याची विनवणी, गय घालत असतांना थकून गेले. पण त्यांना कंपनी मालकाने पास मिळवून दिली नाहीत. कंपनी सुरु झाल्याने काम सुरु करा,नाही तर गावी जायचे असेल तर जा.असे सांगून कंपनी मालकाने काळजी न घेता या मजूराकडे दुर्लक्ष करुन वा-यावर सोडले. हे मजूर अशिक्षित असल्याने ते पास मिळवू शकले नाही. गावी जाताना रस्त्याने पोलीस अडवितील या धाकाने अखेर ते मजूर जालन्यावरुन रस्त्याने न जाता रेल्वेच्या रुळा-रुळाने पायी चालत सटाणा हे सुमारे ४० किलोमीटरचे अंतर कापले.अनवाणी पायाने चालून चालून थकून गेल्यामुळे व रेल्वे बंद आहेत ती धावणार नाहीत या गैरसमजुतीने सटाणा शिवारातील रेल्वे रुळावर ते झोपी गेलेत. तो दिवस होता (८ मे ) शुक्रवार.
पहाटे ५.२२ वाजेच्या दरम्यान मालगाडीचे तब्बल ४५ डब्बे त्यांच्या अंगावरून गेल्याने अक्षरशः त्या १६ मजूरांच्या म्रुतदेहाचे तुकडे- तुकडे झालेत. हा एवढा भीषण अपघात होता की,सुमारे २०० मीटर पर्यंत( ७०० फूट ) रेल्वेने म्रुतदेह फरफटत नेले. कोरोना प्रादुर्भावाने जरी त्यांचा म्रुत्यू झाला नसला तरी त्याआडून निर्माण झालेल्या परिस्थितीने त्यांचा बळी घेतला आहे.त्यामुळे कोरोनाशी रस्त्यावर लढत असणाऱ्या योद्यासाठी ज्या प्रमाणे ‘ प्रधानमंत्री गरीब कल्याण पँकेज अंतर्गत ‘ ५० लाखाचा विमा मंजूर करण्यात आला .त्याच धर्तीवर कोणताच दोष नसलेल्या पण लाँकडाऊन आडून निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीने म्रुत पावलेल्या या १६ मजूरांना प्रत्येकी ५० लाख रुपये सानुग्रह देण्यात यावे.

संबंधित स्टील कंपनी मालकाने निरक्षर असलेल्या आपल्या मजूरांची काळजी घेत पास मिळवून दिली असती तर हे मजूर कोणतीही भिती न बाळगता शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेचा फायदा घेत, आपल्या घरी सुखरुप पोहोचले असते पण त्यांना कंपनी मालकाने वा-यावर सोडल्यामुळे या गरीबांची काळजी कोण घेणार ? त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करुन प्रथम दर्शनी दोषी असलेल्या जालन्यातील या स्टील कंपनी मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.आणि म्रुतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेत नौकरी देण्यात यावी . अशी मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button